ASHA Workers Strike: सरकार, पोटापुरता तरी पगार द्या हो! आशा-गटप्रवर्तकांचा हल्लाबोल, हक्कासाठी संघर्षाला सुरुवात

तीन चार दशकांपासून आरोग्य अभियान राबवून बालमृत्यू, माता मृत्यू कमी केला, परंतु आमच्या जगण्याचे काय असा सवाल विचार हजारावर ‘आशां’नी हक्कासाठी संघर्ष सुरू केला आहे.
ASHA Workers Strike: सरकार, पोटापुरता तरी पगार द्या हो! आशा-गटप्रवर्तकांचा हल्लाबोल, हक्कासाठी संघर्षाला सुरुवात
Updated on

Nagpur ASHA Workers Strike: सरकारी योजनांचा लाभ घरोघरी पोहोचवणाऱ्या आम्ही ‘आशा’. ऐन उमेदीतच का थकतो याचा विचार शासनाने करावा. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करतो, तरीदेखील आम्हा आशांना ‘पोटापुरता पगार’ मिळत नाही. काम करताना कौटुंबिक गरजा दूर ठेवतो. पैसा आला नाही तर पदरमोड करीत, विवंचनेत अडून उमेदीत आम्ही निराशेकडे झुकलो साहेब. तीन चार दशकांपासून आरोग्य अभियान राबवून बालमृत्यू, माता मृत्यू कमी केला, परंतु आमच्या जगण्याचे काय असा सवाल विचार हजारावर ‘आशां’नी हक्कासाठी संघर्ष सुरू केला आहे.

गट प्रवर्तक महिलांना दरमहा १० हजार रुपये आणि आरोग्यवर्धिनीचे पंधराशे रुपये तर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सर्व हक्क व भाऊबीज, तसेच आशा महिलांना दरमहा ७ हजार रुपये मानधन वाढ व भाऊबीज देण्यासंदर्भात अध्यादेश काढल्याशिवाय बेमुदत संप सुरू राहील असा जयघोष यावेळी आशा स्वयंसेविकांनी केला. आयटकचे जनरल सचिव श्याम काळे यांच्या नेतृत्वात बुधवारी (ता.१७) नागपूर जिल्हा परिषदेसमोर आशा वर्कर व गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलनादरम्यान हल्ला बोल केला.(Latest Marathi News)

उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत सरकारला निवेदन देण्यात आले. १२ जानेवारी पासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक बेमुदत संपावर आहेत. जिल्हाध्यक्ष संगीता गौतम ,मंदा डोंगरे ,मंगला पांडे, मंगला लोखंडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु आहे. मंगला लोखंडे, मंदा डोंगरे, गट प्रवर्तक संघटनेच्या संगीता गौतम, सोनू कुकसे, शीतल कळमकर, मोहिनी बालपांडे, पौर्णिमा वासे, ज्योती रक्षित, उषा लोखंडे यांच्यासह हजारावर आशा आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

ASHA Workers Strike: सरकार, पोटापुरता तरी पगार द्या हो! आशा-गटप्रवर्तकांचा हल्लाबोल, हक्कासाठी संघर्षाला सुरुवात
Manoj Bajpayee : फॅमिली मॅन मनोज वाजपेयीनं सांगितला 'फॅमिली प्रॉब्लेम'! 'बायको अन् लेक दोघीही मला...'

काळे वस्त्र धारण करून आंदोलन: साठे

शासनाने आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य करूनही अध्यादेश काढला नाही, तर येत्या २२ जानेवारीला आशा वर्कर व गटप्रवर्तक २२ जानेवारीला काळे वस्त्र घालून सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनचे (सी.आय टी.यू.) अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी केली. (Latest Marathi News)

यापूर्वी १८ ऑक्टोबर २०२३ रोजी अखिल भारतीय आशा गटप्रवर्तक आयटक राष्ट्रीय अध्यक्ष मंगला पांडे यांच्या नेतृत्वात संप पुकारला होता. त्यानंतर ८ नोव्हेंबर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आश्वासन देत दोन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र महाराष्ट्र शासन काही निर्णय घेतला नाही. यामुळे शासनाच्या विरुद्ध आशांमध्ये संतोष उफाळून आला आणि संप पुकारण्यात आला- श्याम काळे, महासचिव, आयटक

ASHA Workers Strike: सरकार, पोटापुरता तरी पगार द्या हो! आशा-गटप्रवर्तकांचा हल्लाबोल, हक्कासाठी संघर्षाला सुरुवात
Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.