नागपूर - जिल्ह्यातील मतदान केंद्रांपर्यंत पोलिंग पार्टी व निवडणूक साहित्य पोहोचून देण्यासाठी एसटी बसेसची सेवा घेण्यात येत आहे. निवडणूक प्रक्रियेत २३४ बसेस व्यस्त असल्याने नागपूर विभागातील एसटीच्या ८८४ नियमित फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला.