सॉरी मित्रांनो, आता जगाला गुडबाय करण्याची वेळ

हा युवक गोरगरिबांना मदत करणे आणि त्यांची सेवा करण्याचे काम तो निस्वार्थ भावनेने करीत.
nagpur
nagpursakal
Updated on

नागपूर : 'मित्रांनो मला माफ करा...आता जगाला गुडबाय करण्याची वेळ आली आहे. चांगले काम करणाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो...आता काही वेळातच फुटाळ्यावर येऊन फेसबुक लाइव्ह करीत आत्महत्या करीत आहे.’ अशी पोस्ट एका युवकाने फेसबुकवर पोस्ट केली. त्यामुळे संपूर्ण पोलिस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांनी धावपळ करीत त्या युवकाचा पाठलाग करून पकडले. त्याने विष प्राशन केले होते. त्याला लगेच मेडिकलमध्ये दाखल केले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाचा प्राण वाचला. योगेश वासुदेव नासरे (२७) असे युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश नासरे हा मूळचा बिष्णूर, ता. नरखेड येथील असून नागपुरातील मेडिकलमध्ये तो आरोग्यदूत नावाने ओळखला जातो. गोरगरिबांना मदत करणे आणि त्यांची सेवा करण्याचे काम तो निस्वार्थ भावनेने करीत होता. तो एका आमदाराच्या रूग्णवाहिकेवर चालक म्हणून कामावरही होता, अशी चर्चा आहे.

nagpur
अफगाणिस्तानवरील भारताचा प्रभाव कमी होईल; पाकिस्तानी मेजर

‘सॉरी मित्रांनो... आता जग सोडून जाण्याची वेळ आली आहे. आई-बाबा मला माफ करा..मी जग सोडून जात आहे. डोक्यावर खूप टेंशन आहे...लोकं बोलतात की आपण काही पाप केले आहे...आता काही वेळातच फुटाळा तलावावर येऊन फेसबुक लाईव्ह करीत आत्महत्या करीत आहे.’ असा मॅसेज फेसबुकवर टाकला. तो दुचाकीने थेट फुटाळ्याकडे निघाला. हा मॅसेज बघून त्याच्या मित्रांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे अंबाझरी पोलिस आणि सीताबर्डी पोलिसांचे पथक फुटाळ्यावर पोहचले.

nagpur
PM मोदींची ‘मन की बात’; या मुद्द्यांवर करु शकतात संबोधित

पीआय अशोक बागूल आणि पीएसआय विनोद मातरे यांनी योगेश पाण्यात उडी घेणार असा अंदाज बांधला. त्यामुळे त्यांनी पोहणे असलेल्या युवकांना फुटाळ्यावर सज्ज ठेवले. परंतु एक वाजताच्या सुमारास दुचाकीने योगेश येताना दिसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या तोंडातून फेस निघत असल्याचे लक्षात येताच मेडिकलमध्ये दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे योगेशचा जीव वाचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.