Nagpur News : धक्कादायक! नागपूरात बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज’मध्ये जम्मू काश्‍मीरच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

मेडिकलच्या नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थिनी
nagpur bsc nursing college student died from jammu kashmir administration police
nagpur bsc nursing college student died from jammu kashmir administration policeesakal
Updated on

नागपूर : मेडिकलशी संलग्न ‘बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज’मध्ये शिकणारी जम्मूकाश्मीर येथील मुलगी तीन दिवसांपासून आजारी होती. येथील वसतिगृहात ती राहाते. तिच्या प्रकृतीची विचारपूस कोणीही केली नाही. मैत्रीणींनी मेडिकलच्या कॅज्युल्टीत नेले.

जेआर-१ यांनी बघितले आणि सुटी दिली. वसतिगृहात परतल्यानंतर प्रकृती गंभीर झाली. अखेर बुधवारी (ता.५) वॉर्ड क्रमांक ५२ तिचा मृत्यू झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली. यानंतर प्रशासनाने तिच्या मामा व आईवडिलांना माहिती दिली.

तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळल्यानंतर प्राचार्यापासून तर साऱ्या प्राध्यापकांनी मेडिकलच्या आयसीयूत धाव घेतली. विशेष असे की, नर्सिंग कॉलजमध्ये वॉर्डन नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. पान ८ वर..

वॉर्डन नसल्याने आपोआपच ही जबाबदारी प्राचार्यांवर आली आहे. प्रकृतीची विचारपूस कोणीही केली नसल्याची जोरदार चर्चा बीएस्सी नर्सिंगमध्ये सुरू आहे. नागपुरातील मेडिकलशी संलग्न बीएस्सी नर्सिंगमध्ये देशभरातील मुली शिकायला येतात.

nagpur bsc nursing college student died from jammu kashmir administration police
Nagpur Police Action : बेपत्ता दोन अल्पवयीन मुलींना शोधण्यात यश; पालकांच्या रागावर सोडले घर

वसतीगृहात त्या राहतात. नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य, वॉर्डन हेच या मुलींचे पालक असतात. परंतु वॉर्डन नाही. यामुळे मुलींची संपूर्ण जबाबदारी प्राचार्यांची आहे. बी.एस्सी.च्या पहिल्या वर्षाला शिकणारी जम्मू काश्मीरमधील ही मुलगी सोमवारपासून आजारी होती, वर्गात गैरहजर आहे.

मात्र तिच्यासंदर्भात कोणीही विचारपूस केली नाही. वसतिगृहात मध्यरात्री दीड वाजता तीची प्रकृती बिघडली. रात्रभर पोटात दुखत होते. मैत्रिणींनी तिला कॅज्युल्टीत आणले. पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या निवासी डॉक्टरने जेआर-१ यांनी बघितले आणि सुटी दिली.

nagpur bsc nursing college student died from jammu kashmir administration police
Nagpur Rain Update : पावसाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी, दुबार पेरणीची घेतली धास्ती

वसतिगृहात गेल्यानंतर काही वेळात तिची प्रकृती गंभीर झाली. बाह्यरुग्ण विभागात मैत्रिणींनीच आणले. बुधवारी (ता.५) डॉक्टरने तिला तत्काळ वॉर्ड क्रमांक ४८ मध्ये दाखल केले. उपचार सुरू केले, परंतु अचानक हाइपरपाइरेक्सियामध्ये गेली.

किडनीवरही परिणाम झाला असल्याची माहिती आहे. प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. नर्सिंग कॉलेजच्या शिक्षकांनानी केलेला हलगर्जीपणा या मुलीच्या जीवावर बेतणारा ठरू शकतो, अशी चर्चा दबक्या आवाजात येथे आहे.

nagpur bsc nursing college student died from jammu kashmir administration police
Nagpur Crime : डोक्यावर हातोडी मारून पत्नीचा खून; सुसाईड नोटमध्ये लिहीले...

प्राचार्यांचा मोबाईल बंद

बीएस्सी आणि एमएस्सी नर्सिंगमध्ये शिकणाऱ्या मुलींचे पालक म्हणून जबाबदारी प्राचार्यांची आहे. या मुलीची प्रकृती बरी नसताही तिला रुग्णालयात कोणी नेले नाही, मैत्रिणी आणि लिनन किपरने ही जबाबदारी पार पाडली.

आयसीयूत दाखल केल्यानंतर मात्र लिनन किपरने ही माहिती दिल्यानंतर प्राचार्यांपासून तर सर्व प्राध्यापक, ट्यूटर वॉर्ड क्रमांक ५२ मध्ये पोहचले. रात्रीदेखील येथे काही जण असल्याची माहिती आहे. यासंदर्भात महिती घेण्यासाठी कॉलेजच्या प्राचार्यांशी संपर्क साधला, मात्र त्यांचा मोबाईल बंद होता.

बीएस्सी नर्सिंगच्या मुलीची प्रकृती गंभीर झाल्याचे कळले. डॉक्टरांना सूचना दिल्या आहेत. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहे.अचानक हाइपरपाइरेक्सियामध्ये गेली.

-डॉ. शरद कुचेवार, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.