नागपूरच्या कॅबचालकाचा औरंगाबादेत निर्घृण खून

कार चोरण्यासाठी घेतला जीव : तीन आरोपींना अटक
Crime News
Crime Newssakal
Updated on

नागपूर : नागपुरातील एका कॅबचालकाचा औरंगाबादमधील करमाडमध्ये गळा आवळून खून(Murder) केला. या हत्याकांडात औरंगाबाद(Aurangabad Police) पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. विशाल वासुदेव रामटेके (वय ३२, रा. दाभा, नागपूर) असे खून झालेल्या आरोपीचे नाव आहे. विशाल राजेंद्र मिश्रा, शिवाजी दत्तू बनसोडे आणि सुदर्शन जनकनाथ चव्हाण (सर्व रा. औसा, लातूर) अशी आरोपींची नावे असून न्यायालयाने १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Nagpur Crime News)

Crime News
राज्यात काल दिवसभरात 34 हजार रुग्ण

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल रामटेके हा कॅबचालक असून ३१ डीसेंबर २०२१ ला त्याला थेट औरंगाबादला जाण्यासाठी भाडे मिळाले. ही बुकिंग हत्येच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विशाल मिश्रा याने केली होती. तो गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून पुणे येथे कॅब चालवायचा. मात्र त्याची कॅब नळदुर्ग पोलिसांनी लुटमारीच्या गुन्ह्यात जप्त केली. त्यामुळे मित्र शिवाजी व सुदर्शन यांना सोबत घेऊन आरोपी विशालने जप्त कारसारखीच दुसरी कार पळविण्याचा कट रचला.

Crime News
Corona Update : अकोला जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट

आरोपी नागपूरला आले. त्यांनी विशाल रामटेकेला भाडे कबुल करून औरंगाबादला जाण्यासाठी तयार केले. आरोपींनी चालक विशाल रामटेके याला औरंगाबाद जिल्ह्यात करमाडजवळील गोलटगाव येथे त्याची कार पळवण्याच्या उद्देशाने गळा आवळून खून केला. ही घटना ३१ डिसेंबर २०२१ मध्ये घडली. या खूनाच्या घटनेनंतर आरोपी पुण्यात एका भाड्याच्या खोलीत लपून बसले होते. मात्र, अखेर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.