Nagpur : माजी पालकमंत्र्यांच्या खर्चावर रोख; फडणविसांची भूमिका

डीपीसीचा सर्वाधिक निधी फक्त उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघालाच
fadanvis raut
fadanvis rautesakal
Updated on

नागपूर : माजी पालकमंत्री नितीन राऊत यांनी डीपीसीचा सर्वाधिक निधी फक्त उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघालाच दिल्याच्या तक्रारींची दखल घेऊन विद्यमान पालकमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सर्व प्रस्तावाची फेरतपासणी करुनच मंजुरी देण्याचे जाहीर केले.

fadanvis raut
Nagpur : संघ मुख्यालयाला घेरावाचा प्रयत्न फसला

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झालेल्या आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत माजी पालकमंत्री नितीन राऊत यांच्यावर जवळपास सर्वांचा रोख होता. त्यांनी आपल्या मतदार संघातच कामे नेल्याचा पाढा भाजप आमदारांनी वाचला. त्यामुळे मागील बैठकीचे इतिवृत्तही कायम झाले नसून २०२२-२३ या वर्षातील कामांचीही फेर तपासणी होणार असल्याने विकास कामांना अप्रत्यक्षरीत्या स्थगितीच राहणार असल्याचे दिसते.

fadanvis raut
Nagpur : संविधानविरोधी म्हणत RSS च्या मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न; 100 जण ताब्यात, कलम 144 लागू

देशपांडे सभागृहात झालेल्या डीपीसीच्या बैठकीत आमदार आशीष जयस्वाल, टेकचंद सावरकर, कृष्णा खोपडे,समीर मेघे, प्रवीण दटके, मोहन मते, राजू पारवे, अभिजित वंजारी, सुनील केदार, मनपा आयुक्त आदी उपस्थित होते.

fadanvis raut
Nagpur : बाबासाहेबांच्या प्रतिज्ञांची पुन्हा उजळणी आवश्‍यक

बैठकीत नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त कायम ठेवण्याचा विषयांसह वर्ष २०२२-२३ साठी मंजूर निधी व खर्चाचा लेखाजोखा सादर केला. राऊत यांनी दलितेतर लेखाशीर्ष अंतर्गत मिळणारा सर्वाधिक निधीचे आपल्याच मतदारसंघात नियोजन केले. खनिज प्रतिष्ठानचा निधीही त्यांनीच घेतला. राऊत यांच्या नावाचा उल्लेख टाळत एकाच मतदारसंघात खनिज प्रतिष्ठानचा ३९ कोटींचा निधी मंजूर झाला असून कोटींच्या निविदाही काढण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. आमदारांना न सांगता निधी त्यांनी घेतल्याच्या तक्रारी आमदारांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.