Nagpur Crime: कारागृहात गांजा आणि मोबाईल नेता येण्यासाठी वापरली जाते ही युक्ती, पोलीस खात्यात थेट वर पर्यंत...

Nagpur Crime News: सावज शोधून दिली जाते जबाबदारी
Nagpur Crime News
Nagpur Crime Newsesakal
Updated on

नागपूर : कारागृहात कुठलेही साहित्य पोहचवायचे असल्यास प्रत्येकाला आलटून पालटून जबाबदारी देण्यात येत असल्याने कुणावरही शंका येत नाही. त्यातून सुलभतेने कारागृहात गांजा आणि मोबाईल नेता येणे शक्य होते. त्यासाठी काही विशिष्ट कर्मचाऱ्यांची विशिष्ट ठिकाणी पोस्टींग होताना दिसून येते.

धंतोली पोलिसांकडून कारागृहात गांजा, मोबाईल बॅटरी आणि सीमकार्ड हे साहित्य पोहचविणाऱ्या तीन सुरक्षा रक्षकांवर यापूर्वी कारवाई करीत, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अखिलेश राठोड आणि प्रशांत राठोड यांच्यासह परमेश्‍वर खुंडे यांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, त्यापूर्वी ५ सप्टेंबर २०२२ रोजी पोलिसांनी कारागृ परिसरात फाईलमध्ये ५१ ग्रॅम गांजा आणि १५ मोबाईल बॅटरी नेणाऱ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली होती. त्यामध्ये मोक्कामधील आरोपी सुरज कावळे,

कामासाठी बदलली जाते ‘पोस्टिंग’

त्याचा भाऊ शुभम कावळे याच्यासह कुख्यात शेखू टोळीचा अथर्व खटाखटी याचाही समावेश होता. विशेष म्हणजे, हे मोबाईल कारागृहाच असलेला बंदीवान उपनिरीक्षक प्रदिन नितवने याचा माध्यमातून मागविण्यात आले होते. त्यानेच सुरज ते कारागृहात पोहचविण्यासाठी शुभमच्या माध्यमातून ४५ हजार दिले होते.

या प्रकरणात कारागृहातील रक्षक सहभागी असल्याने त्यांच्या शोध धंतोली पोलिसांनी घेतला होता. दरम्यान त्यातून सावध होत येथील चार रक्षक हे इतर वेगवेगळ्या रक्षकाला जबाबदारीचे वाटप करीत, असल्याची माहिती समोर आली आहे.

त्यांच्या माध्यमातून सातत्याने ते काम होत नसल्याने नव्या रक्षकाला हेरुन त्यांच्या माध्यमातून हे काम करण्यात येते. ते दररोज सक्रीयतेने साहित्य आतमध्ये पोहचविण्याचे काम करतात.

Nagpur Crime News
Nagpur Crime news : प्रेयसीच्या आईने बोलू दिलं नाही म्हणून प्रियकराचा चाकूहल्ला, अल्पवयीन जोडपे फरार

अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

कारागृहात गांजा, मोबाईल बॅटरी आणि सीमकार्ड आतमध्ये जात असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मात्र, त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. विशेष म्हणजे, कारवाई झाल्यावर त्याबाबत साधारणतः चार ते पाच तासाने स्थानिक पोलिसांना त्याची माहिती दिल्या जाते हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.