Nagpur : चैतन्य आष्टनकर अपहरणातील चार आरोपींना जन्मठेप

सोनेगावात २०१६ मध्ये घडली घटना; तिघे निर्दोष
life-imprisonment-
life-imprisonment-Esakal
Updated on

नागपूर : बहुचर्चित चैतन्य आष्टनकर अपहरण प्रकरणातील चार आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजारांचा दंड ठोठावला. मुकेश तायवाडे, इशाख शेख, दुर्वास कोहाड व तय्यूब शेख अशी दोषसिद्ध आरोपींची नावे आहेत. तर उर्वरित तीन आरोपी प्रभाकर खोब्रागडे, प्रदीप निनावे, रशिद दिवान यांना पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आले.

या सातही आरोपींविरोधात सोनेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायाधीश सलमान आझमी यांनी हा निर्णय दिला. ७ जानेवारी २०१६ रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास चैतन्य मित्रासोबत शाळेतून पायी घरी जात होता. तेव्हा कटानुसार आरोपी कारमध्ये बसून चैतन्यची वाट पाहत होते.

life-imprisonment-
Nagpur : ‘संविधान पार्क’चा तरी आदर ठेवा हो!

चैतन्यच्या घरापासून पन्नास मीटर अंतरावर असलेल्या नवनीत डेकोरेशनच्या जवळ संधी साधून आरोपींनी चैतन्यच्या बाजूला कार थांबवली. याबाबत काही कळण्यापूर्वीच आरोपींनी त्याला जबरदस्तीने उचलून कारमध्ये टाकले. त्यानंतर नियोजनाप्रमाणे खापा येथे रशीद दिवान यांच्या घरी बडेगाव येथे नेऊन चैतन्यला डांबून ठेवले. तसेच, चैतन्यच्या आईला फोन करून ५० लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

पैसे न दिल्यास युग चांडक सारखे कांड करू अशी धमकीही दिली होती. चैतन्यच्या अपहरणाची त्याच्या मित्राने आष्टनकर कुटुंबियांना हकीकत सांगितली. पोलिसांनी अपहरणाचा छडा लावला. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील अभय जिकार यांनी बाजू मांडली. तपास सुभाष काळे, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर तोरे यांनी केला. त्यांना मदतनीस म्हणून पोलिस शिपाई मोरे यांनी काम पाहिले.

life-imprisonment-
Nagpur : ‘संविधान पार्क’चा तरी आदर ठेवा हो!

चैतन्य व मित्रांची साक्ष ठरली महत्त्वाची

चैतन्यच्या घराजवळील अंजली हिवराळे यांची चहा टपरी तर सचिन पांडे यांच्या पानटपरीवर बसून आरोपी चैतन्यची टेहळणी करीत होते. सरकारी पक्षातर्फे चैतन्यसह एकूण २१ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. यामध्ये चैतन्यने संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि आरोपींना न्यायालयात ओळखले. चैतन्यच्या मित्रानेही माझ्यासमोर अपहरण झाल्याची कबुली दिली, तर आईने आरोपींचा खंडणीसाठी फोन आला असल्याची साक्ष दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.