Samaj Kalyan Hostel 37 Students Suspended : विना परवानगी बाहेर जाणे चोखामेळा वसतिगृहातील विद्यार्थ्यांना चांगलेच महागात पडले. याप्रकरणी ३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले असून वार्डन व व्यवस्थापकांना समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
चोखामेळा वसतिगृह समाज कल्याण विभागांतर्गत येते. येथे १०० वर विद्यार्थी असल्याचे समजते. विद्यार्थ्यांना पुरवठादारामार्फत भोजन देण्यात येते. येथील ३७ विद्यार्थ्यांनी भोजनातील काही प्रकार कमी केले. त्याऐवजी पैसा संबंधित पुरवठादाराकडून घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार पुरवठादाराने विद्यार्थ्यांना २७ हजार रुपये दिले. या पैशातून विद्यार्थ्यांनी ट्रीप काढत थेट छत्रपती संभाजीनगर गाठले. नियमानुसार रात्री ७.३० च्या आत विद्यार्थ्यांना वसतिगृहात यावे लागते. विलंब होणार असल्यास त्यास परवानगीकरता अर्ज करावा लागतो. (Latest Marathi News)
हे विद्यार्थी विलंब होणार असल्याचे अर्ज गार्डकडे ठेवून निघून गेले. याची माहिती सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांना मिळाली. त्यांची लगेच वसतिगृहाला भेट देत पाहणी केली. विद्यार्थी नसल्याचे दिसून आले. चौकशीत सर्व प्रकरण समोर आला. या प्रकरणी वार्डन व व्यवस्थापकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर सर्व ३७ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले. या विद्यार्थ्यांना अपिल करण्यासाठी ३० दिवसांची मुदत देण्यात आल्याचे समजते.
असे फुटले बिंग
सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांचा मोबाईल क्रमांक कार्यालयासह वसतिगृहात देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना तक्रार किंवा इतर माहिती यावर कळवता येते. एका मुलाने वसतिगृहातील प्रकाराची माहिती सहाय्यक आयुक्तांना मोबाईलवर दिली. त्यामुळे हा सर्व प्रकार समोर आला. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.