Nagpur : पुण्यात झिका विषाणूची लागण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर नागपूरसह विदर्भातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडिस इजिप्ती’हा डास ‘झिका’चा वाहक असल्यामुळे या विषाणूचा धोका आहे.
मात्र प्रतिबंधात्मक उपायांनी या विषाणूवर सहज मात करता येते. यामुळे सामान्य जनतेने घाबरून जाऊ नये, असे आरोग्य यंत्रणांकडून सांगण्यात आले आले. सध्या नागपूरसह विदर्भात झिका विषाणूचा एकही रुग्ण नाही.
यापूर्वीही विदर्भात झिकाचे रुग्ण आढळलेले नाही. डेंगीला कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती या डासांच्या दंशामुळेच ‘झिका’ची जोखीम आहे. यामुळे झिका कधीही येऊ शकतो. महापालिकेने ‘एडिस इजिप्ती’ डासांची विशेष शोधमोहीम घ्यावी.
तसेच डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावी. ही पहिली जबाबदारी पार पाडल्यास ५० टक्के जोखीम कमी होते, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. समीर गोलावार म्हणाले.
रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या तसेच हृदयविकार, मधुमेह आणि यकृताचे विकार असलेल्या रुग्णांना संसर्गाचा धोका अधिक असतो. सोबतच वयोवृद्ध, गर्भवती व लहान मुलांना हा संसर्ग अधिक होऊ शकतो. यामुळे संसर्गामुळे नवजात बालमृत्यूचे प्रमाण अधिक नसले तरीही यामुळे बाळात जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. तसेच पक्षाघात आणि यकृत बंद पडण्याचा धोका असतो, असे डॉ. म्हणाले.
दोन दिवस ताप येतो
अंगावर चट्टेही उठतात
सांधेदुखी, अंगदुखी, डोकेदुखीचा त्रास
डोळे लाल होतात
अशक्तपणा येतो
युगांडामध्ये झिका शहरात पहिला हा रुग्ण आढळला होता. यामुळे त्याला वैद्यकीय भाषेत झिका असे संबोधतात. झिका जीवघेणा नाही. मात्र लक्षणे आढळल्यास पाणी भरपूर प्यावे. झिका तसेच इतरही विषाणूची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्यासाठी दर सात दिवसांनी घरातील पाण्याची सर्व भांडी रिकामी करावी. घरात आठवड्याला ‘कोरडा दिवस’ पाळावा. पाण्याचे ड्रम्स, टाक्या, घरातील शोभेचे कारंजे, मनी प्लांट, झाडांच्या कुड्यांखालील प्लेटमधील पाणी वरचेवर बदलावे.
-डॉ. समीर गोलावार, सहयोगी प्राध्यापक, (पीएसएम) मेडिकल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.