Nagpur Corona:उपराजधानीत कोरोनाचा सक्रिय रुग्णच नाही! आठ जणांचे नमुने जनुकीय तपासणीला

देशात कोरोनाच्या ‘जेएन १’ या उपप्रकाराचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे उपराजधानीतील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून येथील ८ जणांचे नमुने जनुकीय चाचणीला (जिनोम सिक्वेसिंगला)पाठवले आहेत.
maha_covid
maha_covid
Updated on

Nagpur Covid: देशात कोरोनाच्या ‘जेएन १’ या उपप्रकाराचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे उपराजधानीतील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून येथील ८ जणांचे नमुने जनुकीय चाचणीला (जिनोम सिक्वेसिंगला)पाठवले आहेत. काही दिवसांपूर्वी एक महिला बाधित होती. परंतु ती बरी झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. यामुळे सध्या एकही सक्रिय बाधित नागपुरात नाही.

आजपर्यंत विदर्भातील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण व मृत्यूही नागपुरात नोंदवले गेले होते. मात्र यावेळी आरोग्य यंत्रणेने खबरदारी घेतली आहे. नागपुरात ३० दिवसांपूर्वी महिन्याभरात कोरोनाचे ९ रुग्ण आढळले होते. एका रुग्णाला विदेशी प्रवासाचा इतिहास होता. हिमाचल प्रदेशाचाही इतिहास एका रुग्णाला होता.

नागपूर ग्रामीणच्या ४ रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास नाही. तर नागपूर विमानतळावर दोन दिवसांपूर्वी सर्दी, खोकल्यासह इतर लक्षणाच्या एका महिलेमध्ये केलेल्या तपासणीत कोरोनाचे निदान झाले. परंतु, ती बरी झाली. महिलेसह यापूर्वीच्या आठ जणांचे नमुने जिनोम सिक्वेसिंगसाठी निरीतील प्रयोगशाळेत पाठवले गेले आहे. (Latest Marathi News)

अहवालानंतरच या रुग्णांमधील कोरोनाच्या उपप्रकाराचे निदान होईल. या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचाही शोध महापालिकेकडून घेतला गेला असून कुणालाही प्राथमिक लक्षणे नसल्याचा त्यांचा दावा आहे. तर नागपुरातील एक रुग्ण पुणे येथे गेली असून इतर सगळेच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आहे.

maha_covid
12th Fail OTT Release: २०२३ मध्ये गाजलेला '12th Fail' या आता या OTT वर! कधी? कुठे? जाणून घ्या

सरकारी रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन तसेच खाटांसह वॉर्ड सज्ज आहेत. सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणे आढळल्यास त्वरित उपचारासह करोना चाचणी करण्यात येते. मेडिकल, मेयो येथे कोरोना चाचणी केंद्र सुरू आहेत. महापालिकेची चाचणी केंद्रे लवकरच सुरू होतील. ग्रामीण भागातही चाचणीची सोय आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना खबरदारी घ्यावी, मास्क लावणे, नियमित हात धुणे, सॅनिटायजरचा वापर करावा- डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, नागपूर.(Latest Marathi News)

maha_covid
Who is Radha Rama Mannar: प्रभासच्या 'सालार'मधली 'राधा रमा मन्नार' नक्की कोण? जाणून घ्या अभिनेत्रीबद्दल रंजक गोष्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.