नागपूर शहरात अवघे चार मलेरियाग्रस्त

कोरोनाच्या उद्रेकानंतर डेंगीचा प्रकोप जनता सहन करीत आहे.
मलेरिया
मलेरियाsakal
Updated on

नागपूर : कोरोनाच्या उद्रेकानंतर डेंगीचा प्रकोप जनता सहन करीत आहे. अशातच पूर्व विदर्भात मलेरियाने हातपाय पसरले आहे. गतवर्षीच्या (२०२०) रुग्णांचा रेकार्ड यावर्षी ९ महिन्यातच मलेरियाच्या रुग्णांनी तोडला आहे. गतवर्षी ७ हजार ५१ मलेरियाचे रुग्ण आढळले होते.तर यावर्षी नऊ महिन्यात ७ हजार ८११ मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत. तर या कालावधीत पुर्व विदर्भातील सह जिल्ह्यात १२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे डेंगीनंतर आता मलेरियाचे आक्रमण होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मात्र ३० लाखांच्या नागपूर शहरात अवघे ४ मलेरियाग्रस्त आहेत.

आरोग्य विभागातील पूणे कार्यालयाच्या नोंदीनुसार नागपूर विभागात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत आढळलेल्या ७ हजार ५१ रुग्णांमध्ये सर्वाधिक ६ हजार ४८५ रुग्ण हे एकट्या गडचिरोली जिल्ह्यातील होते. भंडाऱ्यात १४, गोंदियात ३४७, चंद्रपूर ग्रामीणला १९६, नागपूर ग्रामीणला ३, नागपूर महापालिकेत ६ रुग्ण आढळले होते. चंद्रपूर महापालिका, वर्धा जिल्ह्यात मात्र एकही रुग्णाची नोंद झाली नव्हती. यावर्षी १ जानेवारी ते १४ सप्टेंबर २०२१ या साडेनऊ महिन्यात ७ हजार ८११ मलेरियाग्रस्त आढळले.

मलेरिया
VIDEO : सामना फिरवणारी कार्तिक त्यागीची खतरनाक 'डेथ ओव्हर' बघाच

सर्वाधिक ७ हजार ३०० रुग्ण हे केवळ गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. भंडाऱ्यांत ७, गोंदियात ३८१, चंद्रपूर ग्रामीणला १११, नागपूर ग्रामीणला ५, नागपूर महापालिकेत ४, वर्धेत ३ रुग्ण आढळले. या वर्षी चंद्रपूर महापालिका परिसरात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. दरम्यान गेल्या दोन वर्षांत एकही रुग्ण न आढळलेल्या वा एक आकडी रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत हिवतापाची रुग्णसंख्या खूपच कमी दिसत असल्याने तेथील नोंदीवर वैद्याकीय क्षेत्रातील जाणकारानी प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान पूर्व विदर्भात २०२० मध्ये गडचिरोलीत ६, भंडाºयात २, गोंदियात २, चंद्रपूर ग्रामीणला ३ मृत्यू नोंदवले गेले होते. तर १ जानेवारी ते १४ सप्टेंबर दरम्यान गडचिरोलीत ६, चंद्रपूर ग्रामीणला ५, गोंदियात १ मृत्यू नोंदवले गेले. यावर्षीचे बहुतांश मलेरियाचे रुग्ण व मृत्यू हे गेल्या तीन महिन्यातील आहेत.

‘‘नागपूर विभागात जुलै २०२१ मध्ये हिवतापाचे ३,२३५ नवीन रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागाने तातडीने सर्वत्र किटकनाशक फवारणीसह जनजागृती व इतर उपाय सुरू केले. त्यामुळे ऑगस्ट- २०२१ मध्ये हिवतापाच्या नवीन रुग्णांची संख्या २,४६२ एवढी कमी झाली.

- डॉ. श्याम निमगडे, सहाय्यक संचालक (हिवताप), आरोग्य विभाग (नागपूर विभाग).

९ महिन्यात १२ मृत्यू

७ हजार ८११ रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.