Nagpur : गायब सफाई कर्मचारी बडतर्फ

सतत गैरहजर कर्मचारी रडारवर : स्वच्छतेत हयगय करणाऱ्यांना आयुक्तांचा इशारा
magpur cleaning staff
magpur cleaning staffesakal
Updated on

नागपूर : स्वच्छतेसाठी महापालिकेने कठोर दंडात्मक कारवाई सुरू केली. परंतु काही सफाई कर्मचारीच स्वच्छतेच्या कार्यातून अनेक महिन्यांपासून गायब आहे. अशाच एका चार वर्षांत केवळ सहा महिनेच कामावर आलेल्या महिला सफाई कर्मचारीस महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सेवेतून बडतर्फ केले. स्वच्छतेच्या कार्याबाबत दिरंगाई, कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबीही आयुक्तांनी दिली. विना परवानगीने कामावर सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशाराही दिला.

magpur cleaning staff
Nagpur : स्मार्ट नागपुरातील नरक बघायचा असेल तर चला गोंड वस्तीत

महानगरपालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये कार्यरत गौरी राजेश बक्सरे या स्थायी सफाई कर्मचारीस गैरवर्तन व गैरशिस्तीच्या कारणास्तव मनपाच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. गौरी राजेश बक्सरे या गांधीबाग झोनमध्ये स्थायी सफाई मजदूर म्हणून कार्यरत होत्या. त्या २३ एप्रिल २०१८ ते ३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत विना सूचना, विना अर्ज व विना परवानगीने कामावरून सतत गैरहजर होत्या. त्यानंतर कामावर रुजू झाल्यानंतर १६ नोव्हेंबर २०२० पासून ते आजपर्यंत विना सूचना, विना अर्ज व विना परवानगीने कामावरून सतत गैरहजर असल्याचे त्यांच्यावर आरोप होते.

magpur cleaning staff
Nagpur : महापालिकेची स्वच्छता मोहीम जोमात,तीन दिवसांत तीन लाखांचा दंड वसूल

यासंबंधी अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशान्वये विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त सेवानिवृत्त सहायक वनसंरक्षक मंगल एस. करूणाकार यांनी चौकशी केली. यासाठी संबंधित स्वास्थ निरीक्षकांची साक्ष नोंदविण्यात आली. वेळोवेळी नोटीस बजावल्यानंतरही गौरी बक्सरे उपस्थित राहत नसल्याचे निदर्शनास आले. नुकतेच चौकशी अधिकाऱ्यांनी आपला अहवाल मनपाला सादर केला.

magpur cleaning staff
Nagpur : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत छकुलीने घेतली योगामध्ये झेप

या अहवालाच्या आधारावर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यान्वये भविष्यात नोकरी मिळण्यास सामान्यपणे अपात्र होईल अशाप्रकारे गौरी बक्सरे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली. यासंबंधी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी आदेश काढले.

magpur cleaning staff
Nagpur : काँग्रेस पुन्हा घेणार सदस्यांचा कौल

कचरा टाकणाऱ्यांचा फोटो मनपा फेसबुकपेजवर

घरातील कचरा ओला आणि सुका असा वेगवेगळा कचरा संकलित करून तो स्वच्छता कर्मचाऱ्यांकडे सोपविणे आवश्यक आहे. कुणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्यास, त्याचा फोटो काढून तो मनपाच्या फेसबुकपेजवर नाव आणि पत्त्यासह टाकण्यात येणार आहे. याशिवाय मनपाद्वारे संबंधितावर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्तांनी नागरिकांनाही दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.