नागपूर : जिल्हाधिकारी कार्यालयाची अत्याधुनिक सुविधांनीयुक्त ११ मजली इमारत बांधण्यात येणार आहे. इमारतीचे सादरीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष करण्यात आले. त्यांनी हिरवा कंदील दाखविला. लवकरच बांधकाम सुरू होईल.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच महसूल व इतर संबंधित सर्व विभाग आणण्यासाठी नवीन भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. शहर तहसील, सेतू, खनिकर्म तसेच उत्पादन शुल्क विभाग असलेली जुनी इमारत व संजय गांधी निराधार भवन तोडण्यात येणार आहे. प्रथम तळमजला अधिक सहा (सात माळ्यांची) अशी इमारत तयार करण्याचे प्रस्तावित होते.
बांधकाम विभागाने आराखडा तयार केला. मंत्रालयाकडून यात त्रुटी काढून तो परत पाठविला होता. नंतर यात सुधारणा करण्यात आली. राज्यात सत्ता परिवर्तनानंतर शासनाने या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी मेट्रो रेल्वेकडे दिली. नवीन इमारतीबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काही सूचना केल्या. त्या सूचनेनुसार काही बदल करण्यात आले. आता ही इमारत ११ माळ्यांची असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या दोन्ही बाजूंनी दोन इमारती असतील. या इमारतीचा आराखडा व नकाशा नुकताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सादर करण्यात आला.
गुणवत्तापूर्ण इमारत तयार करा : फडणवीस
या इमारतीसाठी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी २०० कोटी देण्याची घोषणा २०२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या इमारतीकडे लक्ष दिले असून, निधी वाढवून देण्यावरही सकारात्मता दर्शविली आहे. नवीन इमारतीवर अडीचशे कोटींचा खर्च येणार असल्याची सूत्रांकडून समजते. इमारतीसाठी निधीची कमी पडणार नाही; परंतु ती दर्जेदार व गुणत्तापूर्ण तयार करा, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.