Nagpur : सक्षम अधिकारी मोर्चे टाळू शकतात ; उपसभापती नीलम गोऱ्हे

पालकमंत्र्यांनी मोठे मोर्चे हाताळावेत
Neelam Gorhe
Neelam Gorheesakal
Updated on

नागपूर : आपापले प्रश्न घेऊन अधिवेशनावर दररोज विविध संघटना मोर्चे घेऊन येत असतात. काही प्रश्न तर फार छोटे असतात जे तत्काळ सुटू शकतात. स्थानिक पातळीवर सक्षम विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी नागरिकांच्या प्रश्‍नांची दखल घेऊन त्यांचे कर्तव्य बजावले तर मोर्चे टाळले जाऊ शकतात, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

गुरुवारी नीलम गोऱ्हे यांनी ‘सकाळ’ कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी विदर्भातील प्रश्न, समस्यांपासून तर राजकीय परिस्थितीवर सर्व सहकाऱ्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारल्या. त्या म्हणाल्या, कोरोना महामारीनंतर अनेक गोष्टी बदलल्या. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. याचे दुष्परिणाम पुढील अनेक वर्षे जाणवणार आहेत. हे बघता

नागरिकांची मनःस्थिती चांगली राहावी म्हणून ‘मानसिक आधार हेल्पलाइन’ सुरू ठेवण्याची गरज आहे. आपत्ती व्यवस्थापनाप्रमाणे ही परिस्थिती हाताळावी, असा सल्लाही नीलम गोऱ्हे यांनी दिला. यावेळी त्यांचे सहकारी रवींद्र खेबुडकर, अविनाश रणखांबे, कौस्तुभ खांडेकर उपस्थित होते. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी नीलम गोऱ्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

न्यायनिवाड्याचे वृत्तांकन वाचनीय व्हावे

अत्याचार व अन्यायाच्या घटना घडतात तेव्हा माध्यमे चार-पाच दिवस सक्षम अधिकारी मोर्चे टाळू शकतात त्याची दखल घेतात. त्याचप्रमाणे संबंधित प्रकरणाचा न्यायालयात न्यायनिवाडा झाल्यानंतर त्याचे सविस्तर वृत्तांकन होत नाही. न्यायालयाने कशाच्या आधारावर शिक्षा सुनावली, तसेच आरोपीला का सोडले, याचे वाचनीय होईल, असे वृत्त माध्यमांनी देण्याची गरज आहे. वाचकांनाही याची उत्सुकता असते, असे त्यांनी सांगितले.

‘सकाळ’च्या उपक्रमांचे कौतुक

सकाळचे सेवाभावी उपक्रम तसेच कोरोनाकाळात सुरू केलेल्या हेल्पलाइनचे नीलम गोऱ्हे यांनी विशेष कौतुक केले. सुमारे २२ वर्षांपासून हिवाळी अधिवेशनानिमित्त विदर्भात येणे सुरू आहे. विदर्भातील प्रश्न, समस्या व इतर घडामोडी या ‘सकाळ’मधूनच आम्ही घेतो. ते सोडवण्यासाठी विधान परिषदेच्या सभागृहाचा वापर केला. आता उपसभापती या नात्याने येथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.