Success Story: शेतकऱ्याची मुलगी बनली उपशिक्षणाधिकारी, राज्यसेवा परीक्षेत ओबीसीमधून शुभांगी राज्यात पहिली

अकोल मूर्तिजापूर तालुक्यातील विराहीत या छोट्या गावातील अल्पभूधारक शेतकरी देवीदास राऊत यांची मुलगी शुभांगी राज्यसेवा परीक्षेत ओबीसी महिलांमधून राज्यात पहिली आली.
Shubhangi Raut
Shubhangi Raut Esakal
Updated on

Shubhangi Raut Education officer: अकोल मूर्तिजापूर तालुक्यातील विराहीत या छोट्या गावातील अल्पभूधारक शेतकरी देवीदास राऊत यांची मुलगी शुभांगी राज्यसेवा परीक्षेत ओबीसी महिलांमधून राज्यात पहिली आली. २३ व्या वर्षी या मुलीने दाेन क्लासवन पदांना गवसणी घालून गरीब कुटुंबातील मुलींसमोर आदर्श निर्माण केला. शुभांगीची २०२२ मध्ये वन विभागात वन परीक्षेत्र अधिकारी म्हणून निवड झाली. ती देहराडून येथे प्रशिक्षण घेत आहे.

राज्यसेवा परीक्षेचा निकाल २० मार्च राेजी जाहीर झाला. यात शुभांगी ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात पहिली आली. शुभांगी २०२२ मध्ये वन विभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण होती. त्यामुळे सध्या ती वनपरिक्षेत्र अधिकारी पदाचे प्रशिक्षण उत्तराखंडमधील डेहराडून येथे घेत आहे. आता राज्यसेवा परीक्षेचा निकाल आला असून, त्यात ती राज्यात पहिली आली. तिची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली. आचारसंहितेनंतर तिला नियुक्ती मिळणार आहे. (Latest Marathi News )

Shubhangi Raut
Bhojshala Latest News: भोजशाळा मशीद आधी होतं सरस्वती मंदिर, माजी ASI अधिकाऱ्याचा मोठा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.