Congress Loksabha List: नागपुरात गडकरींविरोधात ठाकरेंना उमेदवारी, 'अशी' आहे विदर्भातील काँग्रेस उमेदवारांची यादी

काँग्रेसने नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
Nagpur News
Nagpur News Esakal
Updated on

Nagpur Loksabha Constituency: काँग्रेसने नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच रामटेक लोकसभा मतदारसंघातून जिल्‍हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे, गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोळे तर गडचिरोली-चिमूर मतदारसंघातून नामदेव किरसान यांची उमेदवारी शनिवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली.

ठाकरे, बर्वे आणि किरसान यांच्या नावाची आधीपासूनच चर्चा होती. विकास ठाकरे यांनी दोन दिवसांपासून प्रचाराला सुरुवातही केली होती. गडकरी आणि ठाकरे यांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या होत्या. मात्र, अधिकृत घोषणा व्हायची असल्याने ठाकरे समर्थक धास्तावले होते. परंतु, आज काँग्रेसने उमेदवारांची नावे अधिकृतपणे जाहीर केल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आता गडकरींचा थेट मुकाबला विकास ठाकरे यांच्याशी होणार आहे.

राखीव असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून माजी ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी त्यांचे पुत्र, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्यासाठी चांगलाच जोर लावला होता. मात्र, पक्षाने नितीन राऊत यांनीच लढावे असे निर्देश दिले होते. तत्पूर्वी, माजी मंत्री सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनाच उमेदवारी द्यावी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. (Latest Marathi News)

जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने त्यांच्याच नावाचा प्रस्ताव पाठवावा यासाठी दबाव टाकला होता. बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने केदार यांचे काँग्रेस कमिटी आणि रामटेक लोकसभा मतदारसंघावर असलेले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान, भाजपच्यावतीने बर्वे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला होता. त्यात न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.

Nagpur News
Campaign From Radio: लोकसभेचा प्रचार थेट उझबेकीस्तानमधून! प्रचारात टेक्नॉलॉजीचा पहिला वापर डाव्यांनी केला होता..

भंडारा-गोंदिया मतरसंघातील उमेदवारची गॅरंटी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतील होती. त्यांना माजी आमदार यांचे पुत्र प्रशांत पडोळे यांचे नाव पाठविले होते. त्यास मंजुरी देण्यात आली आहे. हा मतदारसंघात नाना पटोले आणि माजी केंद्रीयमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार प्रफुल्ल पटेल यांचे वर्चस्व आहे. दोघांनीही आलटून पालटून हा मतदारसंघ जिंकला आहे. त्यामुळे येथे बरोबरीचा मुकाबला होणार आहे. (Latest Marathi News)

वर्धा ‘होल्ड’वर

चंद्रपूरमधून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवनी वडेट्टीवार तसेच माजी खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या पत्नी, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात चुरस आहे. दोघांनीही प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. काँग्रेसच्या यादीत लोकसभेचा उमेदवार जाहीर केला नसल्याने सस्पेंस वाढला आहे. वर्धा मतदारसंघासाठी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे. वर्धा येथील निवडणूक दुसऱ्या टप्प्यात असल्याने येथील निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादीतर्फे अमर काळे यांचे नाव आघाडीवर आहे.

Nagpur News
गेली तीन दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या उदयनराजेंच्या उमेदवारीवर आज निर्णय; अमित शहा करणार शिक्कामोर्तब!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.