नागपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीसाठी कॉंग्रेस नेत्यांकडून पुन्हा एकदा सदस्यांचा कौल जाणून घेतला जाणार आहे. निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्व सदस्यांना गुप्त ठिकाणी नेण्यात येणार असून तिथेच सर्व सदस्यांकडून वैयक्तिक मत जाणून घेतले जाणार आहे. गुरुवारला जि.प. अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी कॉंग्रेसची दुसऱ्या टप्प्यातील बैठक पार पडली. बैठकीला माजी मंत्री आमदार सुनील केदार, माजी मंत्री तथा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक, ज्येष्ठ नेते नाना गावंडे, सुरेश भोयर आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत कॉंग्रेसच्या सर्व सदस्यांची मते जाणून घेतली. तसेच यावेळी मार्गदर्शन करताना ज्येष्ठ नेत्यांनी आपल्यातील एकनिष्ठता कायम ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच पक्षामध्ये गटबाजीला कुठेही थारा देऊ नका असे, आवाहन केले. इतर सदस्यांची नाराजी टाळण्यासाठी त्या नावावर निवडणुकीच्या दिवशी वेळेवरच अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे चर्चा आहे. सावधगिरीच्या दृष्टिकोनातून सर्व सदस्यांना सहलीला पाठविले जाणार आहे. सत्तापक्ष काँग्रेसकडे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेत्या शांता कुमरे, मुक्ता कोकड्डे, देवानंद कोहळे, प्रीतम कवरे, पिंकी कौरती, नीलिमा उईके आणि शंकर डडमल हे दावेदार आहेत.
कंभाले गैरहजर!
कॉंग्रेस सदस्य नाना कंभाले यांचा अध्यक्ष पदावर दावा होता. यासाठी प्रसंगी विरोधकांशी हात मिळवणी करण्याची तयारी असल्याची भावना त्यांनी अनेकदा सदस्यांकडे व्यक्त करून दाखविली होती. परंतु अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याचे त्यांचा हिरमोड झाला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची भूमिका विरोधाची राहिली आहे. एक सर्वसाधरण सभेत त्यांच्यामुळे सत्ताधाऱ्यांची चांगलीच अडचण झाली होती. आजच्या बैठकीत ते गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आली आहे. त्यामुळे आता अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राष्ट्रवादीच्या बैठकीत कॉंग्रेस विरोधात नाराजी सूर
महाविकास आघाडीत सहभागी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांची गुप्त बैठक हिंगणा येथे पारडी. बैठकीला माजी मंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री रमेश बंग गटातील सर्व आठही सदस्य उपस्थित होते. बैठकीत सदस्यांनी कॉंग्रेस विरोधात नाराजीचा सूर काढला. विरोधकांची कामे होता. परंतु राष्ट्रवादी सदस्यांची कामे होत नाही. राष्ट्रवादी सदस्यांच्या सर्कलमध्ये भाजपचे नेते भूमीपूजन करात, अशी मत व्यक्त करण्यात आली. कॉंग्रेससोबत जाण्याबाबत दोन्ही गटाने नेत्यांना निर्णय घेण्याचा अधिकार दिला. सध्यातरी राष्ट्रवादी तटस्थ असून प्रसंगी विरोधाची भूमिका घेण्याची शक्यताही सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.
शनिवारला भाजपची बैठक
कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांवर भाजपची नजर आहे. त्यांच्यातील नाराजांना भाजपकडून हेरले जात आहे. अनेक नाराज संपर्कात असून शनिवारपर्यंत त्यांना आपला निर्णय कळवायचा आहे. त्यानंतर भाजप भूमिका घेणार असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.