Nagpur : काँग्रेसची कर्नाटकप्रमाणेच मनपा निवडणुकीसाठी ‘मायक्रोप्लानिंग’; पंधरा बूथचा एक वॉर्ड

karnataka election result 2023 congress won bharat jodo yatra politics
karnataka election result 2023 congress won bharat jodo yatra politicsSakal
Updated on

नागपूर : महापालिका निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत मिळत असून शहर कॉंग्रेसही जोमाने कामाला लागली आहे. कॉंग्रेसनेही तळागळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘मायक्रोप्लानिंग’ केल्याचे दिसत आहे.

karnataka election result 2023 congress won bharat jodo yatra politics
Nagpur : जिल्हा परिषदेची मान देशात उंचवली; रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रयोगाची श्रीलंकेकडून दखल

नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कॉंग्रेसने प्रभागनिहाय समस्या निवारण समिती स्थापन केली. याशिवाय पंधरा बूथचे एक वॉर्ड तयार केला असून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली आहे. महापालिका निवडणूक लांबल्याने माजी नगरसेवक निराशेत होते. परंतु कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या विजयाने शहरातील कॉंग्रेसचे माजी नगरसेवकच नव्हे तर कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांतही उत्साहाचे वातावऱण आहे. त्यामुळे हा उत्साह महापालिका निवडणुकीपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांना नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

karnataka election result 2023 congress won bharat jodo yatra politics
Nanded : धक्कादायक! चुकीचे इंजेक्शन दिल्याने तरुणीचा मृत्यू; नातेवाईकांनी मृतदेह...

मागील चार सदस्यीय प्रभागरचनेनुसारच महापालिका निवडणूक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शहरातील ३८ प्रभागांमध्ये कॉंग्रेसने समस्या निवारण समित्या गठीत केल्या आहेत. प्रत्येक समितीच्या अध्यक्षाचीही नियुक्ती केली. परंतु केवळ प्रभाग समिती करून भागणार नसल्याची जाणीव असलेले कॉंग्रेस शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी पंधरा बूथचा एक वॉर्ड, त्यावर पदाधिकारी अशी रचना तयार केली. यापुढेही जाणार असल्याचे त्यांनी नमुद केले.

कॉंग्रेस प्रत्येक घरापर्यंत, घरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे. यासाठी पुढील आठवड्यापासून प्रत्येक प्रभागाची बैठक घेतली जाणार आहे. यात नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेमके काय करावे, समस्यांचा पाठपुरावा आदीबाबत आढावा घेतला जाणार आहे.

यातूनच मतदारांसोबत संपर्क वाढविण्यात येणार आहे. आमदार विकास ठाकरे स्वतः महापौर असल्याने प्रशासनापर्यंत समस्या पोहोचविणे, त्या सोडविण्याचे कसब ते कार्यकर्त्यांनाशी शेअर करणार आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून कॉंग्रेस सत्तेपासून दूर आहे. परंतु सध्या स्थितीत कॉंग्रेसमध्ये उत्साह असून येत्या निवडणुकीत महापालिकेत सत्ता काबिज करण्यासाठी कामाला लागली आहे.

"सध्या महापालिकेचे अधिकारी नागरिकांच्या समस्यांची दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे कॉंग्रेसने प्रभागनिहाय समस्या निवारण समिती स्थापन केली. याशिवाय पंधरा बूथचा एक वॉर्ड अशी रचना करण्यात आली. या पंधरा बूथमधील समस्या प्रशासनापर्यंत पोहोविणे, पाठपुरावा करून त्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करण्यात येणार आहे."

- आमदार विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, कॉंग्रेस.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()