Nagpur : सभापतिपदावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व

रामटेकमध्ये शिदे गटाचा सभापती; उपसभापतिपदावर भाजप समाधानी
congress ncp nagpur
congress ncp nagpuresakal
Updated on

नागपूर : जिल्‍ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने ९ जागा जिंकून ग्रामीण भागात आपली पकड घट्ट असल्याचे दाखवून दिले. तर राष्ट्रवादीने नरखेड, काटोल आणि हिंगणा पंचायत समितीवर झेंडा फडकविला. तर शिंदे गटाचे आशीष जायस्वाल यांनी रामटेक पंचायत समितीमध्ये आपला उमेदवार निवडून आणला. भाजपला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही. मात्र, कुही, मौदा आणि रामटेक येथे उपसभापती पदावर विजय मिळविला आहे.

congress ncp nagpur
Nagpur : मनोहर म्हैसाळकर अनंतात विलीन

कुहीत वनिता मोटघरे सभापती

वेलतूर ः कुही पंचायत समितीचे सभापती पद एससी प्रवर्गासाठी राखीव होते. सभापती पदासाठी कॉग्रेसच्या वनिता मोटघरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या विजयी झाल्या. उपसभापतिपदी भाजपचे बाळूभाऊ(इस्तारी) रोघोजी तळेकर यांनी निवडून आले. ईश्वरचिठ्ठीने भाजपला उपसभापती पद मिळाले.

congress ncp nagpur
Nagpur : गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान

नरखेड पंचायत समिती सभापतीपदी महेंद्र गजबे

नरखेड/ जलालखेडा ः नरखेड पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादीचे महेंद्र गजबे यांची अविरोध निवड झाली. तर उपसभापती पदी माया मुढोरिया यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे स्वप्नील नागपुरे यांच्यावर सहा विरुद्ध दोन अशा मतांनी विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुभाष पाटील यांना शून्य मत मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस ची धुरा सतीश शिंदे यांनी तर भाजपची धुरा उकेश चौहान यांनी सांभाळली.

congress ncp nagpur
Nagpur : शेतकऱ्यांना त्रास दिला तर याद राखा !

काटोल सभापतीपदी संजय डांगोरे

काटोल :पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाने सत्ता कायम राहून सभापतीपदी संजय डांगोरे तर उपसभापती पदी काँग्रेसचे निशिकांत नागमोते यांची बहुमताने निवड करण्यात आली.आठ सदस्य संख्या असलेल्या या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे चार भाजपचे दोन शेकाप एक तर काँग्रेस एक सदस्य आहेत. यावेळी संजय डांगोरे यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली.

congress ncp nagpur
Nagpur : काटोल-नरखेडला एक्सप्रेसचा नियमित थांबा

२२ वर्षानंतर कॉंग्रेसला सभापती पद

कामठी: सर्वसाधारण महिला पदासाठी आरक्षित असलेल्या कामठी पंचायत समितीच्या सभापतीपदी पंचायत समिती सदस्य दिशा चनकापुरे तर उपसभापतिपदी दिलीप वंजारी याची निवड करण्यात आली. तब्बल २२ वर्षानंतर काँग्रेसच्या उमेदवाराची सभापती, उपसभापतिपदी वर्णी लागून एकहाती सत्ता मिळाल्याची आनंदाची बाब असल्याचे मनोगत माजी जि. प. अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर यांनी व्यक्त केले.

congress ncp nagpur
Nagpur : पावसाचा रब्बीला फायदा, खरिपामध्ये अनेकांचे नुकसान

हिंगणा सभापतीपदी सुषमा कावळे

हिंगणा : पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली असून, सभापती पदी सुषमा कावळे ,तर उपसभापती उमेशसिंह राजपूत यांची बहुमताने निवड करण्यात आली. हिंगणा पंचायत समितीत १४ सदस्यसंख्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, भाजपचे ५,तर काँग्रेसचे १ सदस्य आहेत. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येईल, हे स्पष्ट होते.माजी मंत्री रमेशचंद्र बंग, माजी आमदार विजय घोडमारे, जि. प. महिला व बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे ,जि. प. सदस्य दिनेश बंग,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आशिष पुंड,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे,भैय्यालाल राजपूत,नाना शिंगारे, कवडू भोयर,प्रवीण घोडे उपस्थित होते.

congress ncp nagpur
Nagpur : राजकीय ‘संगीत खुर्ची’चा खेळ रंगणार

ईश्वर चिट्टीने कॉंग्रेसचा सभापती

मौदा :- पंचायत समिती निवडणुकीत सभापती ईश्वर चिट्टीने स्वप्नील श्रावणकर व उपसभापती ईश्वर चिट्टीने खेमराज चाफले निवडून आले. निवडणुकीत काँग्रेसचे ५ सदस्य व भाजपचे ४ सदस्य व शिवसेनेचा १ सदस्य असे १० सदस्य उपस्थित होते. काँग्रेस तर्फे स्वप्नील श्रावणकर, भाजप सेना तर्फे ज्ञानेश्वर चौरे सभापती पदाकरिता तर उपसभापती पदाकरिता काँग्रेस तर्फे अनिल बुराडे व भाजप सेना तर्फे खेमराज चाफले यांचे फार्म भरण्यात आले.

congress ncp nagpur
Nagpur : काँग्रेस पुन्हा घेणार सदस्यांचा कौल

मंगला निंबोणे सभापती

पारशिवनी ः पारशिवनी पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या मंगला उमराव निंबोणे सभापतीपदी तर करुणा भोवते या उपसभापतिपदी बिनविरोध निवडून आल्या. सभापती पदासाठी मंगला उमराव निंबोणे ,यांनी सभापती पदासाठी तर उपसभापतीपदा साठी करुणा बोलते,यांनी अर्ज दाखल केला होता. तसेच काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांनी एकमताने यांना विजयी केले.

congress ncp nagpur
Nagpur : स्मार्ट नागपुरातील नरक बघायचा असेल तर चला गोंड वस्तीत

भिवापूरच्या सभापती माधुरी देशमुख

भिवापूर ः पंचायत समिती सभापतीपदी काँग्रेसच्या माधुरी संजय देशमुख तर उपसभापतिपदी राहुल मसराम यांची अविरोध निवड करण्यात आली.मावळत्या सभापती ममता शेंडे व नांद सर्कलमधून निवडून आलेल्या माधुरी देशमुख यांच्यात सभापतिपदासाठी चुरस होती. ममता शेंडे यांनी अडीच वर्ष सभापतिपद सांभाळले असल्याने पक्षश्रेष्ठींनी त्यांचा कल माधुरी देशमुख यांच्या बाजूने दिला.

congress ncp nagpur
Nagpur : हुबळी-धारवाडच्या महापौरांची मनपाला भेट

सावनेर, कळमेश्वर, उमरेड कॉग्रेसचा बालेकिल्ला

उमरेड येथे सभापतीपदी गीतांजली सतीश नागभिडकर तर उपसभापतिपदी सुरेश दयाराम लेंडे यांना यश मिळाले आहे.माजी मंत्री व जिल्ह्यातील काँग्रेसचे मातब्बर नेते सुनील केदार यांच्या मतदारसंघातील सावनेर व कळमेश्वर या दोन्ही तालुक्यात काँग्रेसने विजय मिळविला. सावनेरमध्ये अरुणा शिंदे सभापती तर राहुल तिवारी उपसभापती म्हणून निवडून आले. तसेच कळमेश्वर तालुक्यात प्रभाकर भोसले सभापती तर श्रावण भिंगारे उपसभापतिपदी विजयी झाले.

congress ncp nagpur
Nagpur : रस्ते, बांधकामाची कामे रद्द

सभापतिपदी संजय नेवारे

रामटेकः रामटेक पं.स वर अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिवसेना भाजप युतीचा भगवा फडकला.आमदार अॅड आशीष जयस्वाल म्हणजेच शिवसेना (शिंदे) गटाचे संजय नेवारे हे सभापती पदी तर भाजपचे नरेंद्र बंधाटे हे उपसभापतिपदी पाच विरुद्ध चार मतांनी विजयी झाले. काँग्रेसचा एक सदस्य अनुपस्थित राहिला. रामटेक पंचायत समितीमध्ये एकूण दहा पं.स..सदस्यांपैकी शिवसेना ४,काँग्रेस चार,गोगपा एक व भाजप एक असे पक्षिय बलाबल आहे.

congress ncp nagpur
Nagpur : महापालिकेची स्वच्छता मोहीम जोमात,तीन दिवसांत तीन लाखांचा दंड वसूल

ग्रामीणमध्ये रूपाली मनोहर सभापती

वाडी : नागपूर पंचायत समितीच्या काल शनिवारी संपन्न झालेल्या सभापती व उपसभापती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी ने पुन्हा विजय मिळविला असून सभापती पदावर काँग्रेस च्या गोधणी रेल्वे गणातून निर्वाचित रूपाली राहुल मनोहर तर उपसभापतिपदी काँग्रेस चे अविनाश धनराज पारधी हे ८ विरुद्ध ३ मतांनी विजयी झाले.विजया चा निकाल समजताच बाहेर काँग्रेस समर्थकांनी वारे काँग्रेस चा जल्लोष केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.