Nagpur : कंत्राटी डॉक्टर आश्वासनाच्‍या श्वासावर

शासनाच्या सुट्यांचा लाभ नाही; कुटुंबाची ओढाताण; स्थायी करण्याची मागणी
Nagpur Contractual Doctors
Nagpur Contractual Doctors
Updated on

नागपूर : ‘रुग्णसेवेचा धर्म आम्ही निभावतो. संसर्ग आजारांपासून तर कोरोनासारख्या महामारीच्या काळातही नागरिकांना रुग्णसेवा देण्याचे कर्तव्यही पार पाडतो. कर्तव्य निभावताना कोरोनाने काही डॉक्‍टरांचा मृत्यू झाला. मात्र, आमचे मृत्यू सरकार उघड्या डोळ्यांनी बघत आहे. चार वर्षांपासून कंत्राटी असल्याने केवळ वेतनावर समाधान मानतो. शासनाच्या कोणत्याही सुट्यांचा लाभ नाही. त्यामुळे कुटुंबाची ओढाताण. निदान पवित्र अशा वैद्यकीय व्यवसायाला तरी कंत्राटीकरणापासून वाचवा हो’ ही आर्त हाक आहे कंत्राटी वैद्यकीय शिक्षकांची. राज्य शासनाने चारशेवर वैद्यकीय शिक्षकांना स्थायी करण्याचे आश्‍वासन दिले. त्याच आश्‍वासनाचा श्‍वास घेऊन आयुष्य जगत असल्याचे विदारक चित्र अवघ्या महाराष्ट्रात आहे.

मेडिकल, मेयोसह राज्यातील २४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कार्यरत साडेचारशे कंत्राटी वैद्यकीय शिक्षक आहेत. कंत्राटी वैद्यकीय शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचे आश्वासन २०१८ पासून संबंधित वैद्यकीय शिक्षण मंत्री देत आहेत. या कंत्राटी शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल, असे आश्वासन २०१८ मध्ये वैद्यकीय शिक्षणमंत्री असताना गिरीश महाजन यांनी दिले. यानंतर कोरोना काळात २०१९ आणि २०१० मध्ये कंत्राटी डॉक्टरांनी केलेल्या कर्तव्याचे योग्य मूल्यमापन होईल, ते लवकरच स्थायी होतील, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिले. आता पुन्हा सत्ता बदल झाला.

गिरीश महाजन यांच्याकडे पुन्हा वैद्यकीय शिक्षण हे खाते आले. यामुळे पुन्हा त्यांच्याकडे कंत्राटी डॉक्टरांना नियमित करण्याची मागणी रेटून धरणार असल्याचे महाराष्ट्र मेडिकल टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. समीर गोलावार म्हणले.

जिल्ह्या-जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय

२०१४ पर्यंत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे चालविण्यात येणारी १४ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये होती. मात्र २०२२ पर्यंत नागपुरातील मेयो, मेडिकलसह गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, नंदूरबार, धुळे, नांदेड, औरंगाबाद, मुंबई, लातूर, सोलापूर, अंबेजोगई, मिरज, जळगाव, बारामती, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, उस्मानाबाद अशी मेडिकल कॉलेजची संख्या २४ वर पोहचली आहे.

वर्गवारी - मंजूर पदे - नियमित भरलेली पदे - कंत्राटीवर भरलेली पदे - रिक्त पदे

प्राध्यापक - ४४० - २९४ - ११७ - १०९

सहयोगी प्राध्यापक - १०३९ - ६९२ -१९७ - १५०

सहाय्यक प्राध्यापक - १६४५ - ९३४ - ३८७ - ३२४

अस्थायी वैद्यकीय शिक्षकांना स्थायी करण्यासंदर्भात २०१८ पासून तर २०२२ पर्यंत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्यापासून तर संचालकांनी सकारात्मकता दाखवली. समायोजित करण्यासंदर्भातील नियोजन सुरू आहे. हेच आश्वासन मिळत गेले. मात्र, अद्याप स्थायी करण्यात आले नाही.

- डॉ. समीर गोलावर, अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल टीचर्स, असोसिएशन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.