Nagpur Corona Update | कोरोनाचे भय वाढले!

२१५० नवे बाधित; एकाचा मृत्यू
Coronavirus death
Coronavirus death sakal
Updated on

नागपूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट (COVID-19 third wave) आता वेग घेत असून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. शनिवारी (ता.१५) एकाच दिवशी २ हजार १५० कोरोनाबाधितांची नोंद जिल्ह्यात झाली. तर जिल्ह्याबाहेरच्या एका कोरोनाबाधिताचा मृत्यू नागपुरात झाला आहे. बाधितांच्या तुलनेत चार पटीने कोरोनाबाधितांची वाढ होत आहे.

Coronavirus death
"नाणार प्रकल्पाला विरोध कराल तर..."; शिवसेना आमदार राजन साळवींना धमकी

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीपासूनच कोरोनाच्या संख्येत वाढ होत आहे. १ ते १५ जानेवारी २०२२ या पंधरा दिवसांच्या कालावधीत चक्क १२ हजार ७४० कोरोनाबाधितांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. त्यातच चार दिवसांपासून मृत्यूसत्र सुरू झाले यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. मृत्यूवर सध्यातरी नियंत्रण आहे, मात्र हलगर्जीपणा झाल्यास जीवहानीचा धोका असल्याचे तज्ज्ञाकंडून वर्तविण्यात येत आहे. शनिवारी जिल्ह्यात ११ हजार ५७३ कोरोना चाचण्या झाल्या. यापैकी २ हजार १५० जणांचे अहवाल कोरोनाबाधित आढळले. यात शहरातील १ हजार ६६९, ग्रामीणमधील ३९२ व जिल्ह्याबाहेरील ८९ बाधितांचा समावेश आहे. यासोबतच जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ०६ हजार ७८७ वर पोहचली आहे. दिवसभरात शहरातून ५३३, ग्रामीणमधून १२८ व जिल्ह्याबाहेरील ३४ असे ६९५ जण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. परंतु बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण कमी आहे.

Coronavirus death
अमेरिकेतील टेक्सासमध्ये बंदुकधाऱ्याने नागरिकांना ओलीस ठेवल्यानं खळबळ

त्यात जिल्ह्याबाहेरच्या एका कोरोनाबाधिताचा मृत्यू नागपुरात झाला. यामुळे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १० हजार १२९ वर पोहचला आहे. दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु असताना रुग्णसंख्येचे दर दिवसाला विक्रम नोंदविले जात होते. तीच परिस्थिती येऊन ठेपली आहे. यापूर्वी जिल्ह्यात १३ मे २०२१ रोजी २ हजाराचा पल्ला गाठला होता.त्यानंतर ८ महिन्यानंतर शनिवारी (ता.१६ जानेवारी) २०२२ रोजी प्रथमच रुग्णसंख्या दोन हजारांपलिकडे पोहचली आहे.

Coronavirus death
अस्मिता मराठी...फक्त भावनिक राजकारणासाठी!

ओमिक्रॉनचे ३९ रुग्ण आढळले

शनिवारी ओमिक्रॉनचे आणखी ३९ रुग्ण आढळले. त्यामुळे उपराजधानीत ओमिक्रॉनबाधितांची एकूण संख्या २१४ च्या घरात पोहोचली आहे. नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नीरी)मध्ये सलाईन गार्गल या जिनोम सिक्वेसिंगच्या तपासणी पद्धतीमध्ये गुरुवारी ७३ ओमिक्रॉनबाधित आढळले. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ओमिक्रॉन बाधितांची संख्या १७५ पर्यंत पोहोचली. यात शनिवारी आणखी ३९ रुग्णांची भर पडली. उल्लेखनीय म्हणजे दुसऱ्या लाटेतही डेल्टाच्या तपासणीत राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था (नीरी) ने सलाईन गार्गल या जिनोम सिक्वेंसिंगची पद्धत तपासणीसाठी वापरली होती. नीरीमध्ये जिनोम सिक्वेसिंग सुरू होण्यापूर्वी नमुने हैदराबाद येथे पाठवण्यात येत होते. दरम्यान पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेसिंग पाठविणे सुरू झाले, पण त्याचा अहवाल प्रतीक्षेत राहात होता.

Coronavirus death
LIC च्या या योजनेत दररोज 200 रुपये वाचवा! Maturityवर कमवा 28 लाख

सक्रिय बाधित १० हजाराच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप सुरू झाला. कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनामुक्तांचे प्रमाण घटत आहे. यामुळे जिल्ह्यात दर दिवसाला कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. सद्या १० हजाराच्या उंबरठ्यावर सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या येऊन ठेपली आहे. शहरात ८ हजार २, ग्रामीणमध्ये १हजार ६५२ व जिल्ह्याबाहेरील १६० असे ९ हजार ८१४ सक्रिय कोरोनाबाधित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.