Nagpur Abduction: अपहरण करण्यासाठी ‘वेबसिरीज’मधून धडे, प्रेमीयुगुलाचे भन्नाट प्लॅनिंग; ‘एनआयए’चे अधिकारी असल्याचा बनाव

अपहरण करण्यासाठी त्यांनी एका ‘वेबसिरीज’मधून धडे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसांमध्येही प्रचंड खळबळ उडाली आहे.
Nagpur
Nagpur Esakal
Updated on

Nagpur Couple Abducted Girl: कंपनीचे काम संपल्यावर युवती घराकडे जात असताना, स्वप्नील मरसकोल्हे आणि चेतना बुरडे या दोघांनीही तिचे अपहरण केले. दरम्यान अपहरण करण्यासाठी त्यांनी एका ‘वेबसिरीज’मधून धडे घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पोलिसांमध्येही प्रचंड खळबळ उडाली आहे.

कर्जबाराजीपणामुळे दोघेही हैराण असल्याने कुठून इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल यासाठी दोघेही विचार करीत होते. यादरम्यान दोघेही एका ओटीटीवर ‘रुद्रा’ ही गुन्हेगारीशी संबंधित वेबसिरीज बघत होते. त्यामधून त्यांनी अशाप्रकारे अपहरण करण्याची योजना आखली. प्रथम स्वप्नील आणि चेतना यांनी यापूर्वीही एका मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी त्यांनी युवतीला ‘एनआयए’चे अधिकारी असून तपासणीसाठी जावे लागेल असे सांगितले होते. मात्र, काही कारणाने हा प्रयत्न फसला होता. त्यांची नजर या युवतीवर गेली. दोघांनीही मिळून युवतीची रेकी केली. चेतनाला तिच्या घरची परिस्थिती चांगली असल्याचे कळले. २० तारेखेला रात्री ८.४५ ला कार्यालयातून बाहेर पडताच एनआयए अधिकारी असल्याचे सांगून चौकशीच्या बहाण्याने तिला सोबत घेऊन गेले. तिला हिंगण्यातील महाजनवाडी येथील चाळीतील एका खोलीत बांधून ठेवले. (Latest Marathi News)

त्यानंतर चेतनाने तिच्या मोबाइलवरून घरी उशिरा येत असल्याचा फोन केला आणि काही वेळातच बंदही करून टाकला.

Nagpur
Ed Sheeran: एड शीरनही झाला 'मिसळ प्रेमी'; स्वत: बनवली झणझणीत मिसळ, व्हिडीओ व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()