Ganeshpeth Fruit Seller Murder Case: गणेशपेठ येथील बसस्थानकासमोर फळविक्रेत्याची व्यावसायिक वादातून शुक्रवारी (ता.२९) हत्या करण्यात आली. याप्रकरणात आरोपी चेतन बगमारे याला स्वतःचा खून होण्याची भीती असल्याने ते होण्यापूर्वीच योगेशचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीला शनिवारी (ता.३०) दुपारी दोन वाजताचा सुमारास उमरेड येथून अटक करण्यात आली.
योगेश उमरे (वय ४७, रा. चंदननगर) गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकासमोरील भागात फळाचे दुकान लावत होता. सोबतच खासगी वाहनांमध्ये प्रवासी बसवून द्यायचा, यासाठी त्याला कमीशन मिळत होते. बसस्थानकासमोरील शेतकरी भवनामागील मोकळ्या जागेत २ ते ३ वेगवेगळे खासगी वाहन तळ आहेत.
त्यात एक राजेश यादव याच्याकडे चेतन रमेश बगमारे (वय २२, रा.गुजरवाडी) काम करीत होता. दरम्यान काही महिन्यांपासून योगेश हा प्रवासी जमा करून पार्कींगच्या जागेत थांबवून ठेवायचा, तसेच त्यांना घेण्यासाठी येणारे वाहनही याच जागेपुढे उभे करायचा. यामुळे वाहनतळाची मोठी जागा व्यापण्यासोबतच वाहन ठेवण्यात व काढण्यातही अडचणी येत होत्या. यावरून चेतनचे त्याच्याशी भांडण झाले होते. (Latest Marathi News)
योगेशने त्याला मारण्याची धमकीही दिली होती. मात्र, दोघांमध्ये समझौता झाला. मात्र, त्यानंतरही चेतनला योगेशकडून घातपाताची शक्यता असल्याने त्याने साथीदार चेतन पाटील (वय २३, रा. गुजरवाडी) इतरांच्या मदतीने योगेशचा गेम करण्याचे ठरविले होते.
त्यातून सायंकाळी योगेश वाहनतळाकडे येताच त्याला घेरून शस्त्राने घाव घालत त्याचा खून केला आणि दोघेही पसार झाले. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोघांनाही उमरेड येथून अटक केली. उद्या त्यांना विशेष सत्र न्यायालयासमोर सादर करण्यात येईल. (Latest Marathi News)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.