Nagpur Crime: नागपुर हादरले! चोवीस तासांत तीन खून, उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून युवकांचा खून

शुक्रवारी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन घटनांमध्ये उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून दोन युवकाचा खून झाला. याशिवाय कळमन्यातील भरतवाडा येथे क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका युवकाने दुसऱ्याला चाकूने भोसकले.
Nagpur Crime: नागपुर हादरले! चोवीस तासांत तीन खून, उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून युवकांचा खून
Updated on

Murder Cases in Nagpur: शहरात खुनाचे सत्र सुरूच असून आता चोवीस तासांत तीन खून झाल्याने पुन्हा नागपूर शहर हादरले आहे. शुक्रवारी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन घटनांमध्ये उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून दोन युवकाचा खून झाला. याशिवाय कळमन्यातील भरतवाडा येथे क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका युवकाने दुसऱ्याला चाकूने भोसकले.

पहिल्या घटनेत कार चालविण्यासाठी घरी येत नसल्याने झालेल्या भांडणातून ३० वर्षीय युवकाला धक्का देत खाली पाडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होत, मृत्यू झाला. ही घटना नंदनवन पोलिस हद्दीत जुना बगडगंज परिसरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली.

सचिन यशवंत उईके (वय ३०, रा. जुना बगडगंज, कुंभारटोली, पाचक्वॉर्टर जवळ) असे मृताचे तर दर्शन रवींद्र भांडेकर (वय २३, रा. बाभुळबन, गरोबा मैदान, लकडगंज) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दर्शन यांच्याकडे सचिन काही महिन्यांपासून ड्रायव्हर होता. काही दिवसांपासून त्याने कामावर जाणे बंद केले होते. त्यामुळे दर्शनची गैरसोय होत होती. शुक्रवारी सकाळी दर्शन त्याचा घरी गेला. (Latest Marathi News)

त्याने वस्त्र मेन्स वेअर दुकानाजवळ त्याला गाठले. दोघांमध्ये वाद झाला आणि ते एकमेकांना मारहाण करू लागले. यामध्ये दर्शनने त्याला जोराचा धक्का दिल्याने तो डोक्यावर खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्यामुळे दर्शन फरार झाला. पत्नी राजेश्‍वरी यांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. शनिवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ३०७ वरून ३०२ कलमानुसार गुन्हा दाखल करीत, दर्शनला अटक केली.

Nagpur Crime: नागपुर हादरले! चोवीस तासांत तीन खून, उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून युवकांचा खून
Menopause Care : रजोनिवृत्तीच्या काळात महिलांनी घ्यावी अशी काळजी; जीवनशैलीत करा 'हे' बदल

उधारीच्या पैशाच्या वादातून खून
देशपांडे ले-आउट परिसरात उधारीच्या पैशाच्या देवाण-घेण्याच्या वाद आणि जुन्या भांडणातून विलास ऊर्फ मटर रामकृष्ण वानखेडे (रा. हिवरीनगर पॉवर हाउसजवळ, नंदनवन) याच्यासह त्याचा साथीदाराने फरशीने वार करीत निरज भोयर (वय २८, रा.गरोबा मैदान) याचा खून केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विलास व नीरजही खासगी काम करायचा. विलासने नीरजकडून काही पैसे उधार घेतले होते. मात्र, विलासने त्याला पैसे परत केले नव्हते. त्यामुळे दोघांमध्ये वादही झाला होता. (Latest Marathi News)

शुक्रवारी (ता.९) रात्री दहा वाजताच्या सुमारास विलास त्याला देशपांडे लेआउट परिसरातील कल्पतरू निवासी रस्त्यावर भेटला. त्याच्यासोबत विशाल भगवान राऊत (वय २७, रा. क्वेटा कॉलनी, लकडगंज) हा होता. विलास आणि त्याच्या साथीदारांनी दोघांनाही हातबुक्क्यांनी मारहाण केली. दोघेही खाली पडताच, विलासने फरशी उचलून निरज आणि विशालच्या डोक्यात हाणली. त्यामुळे नीरजचा जागीच मृत्यू झाला. तर, विशालवर ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

क्रिकेट खेळण्याच्या वादातून खून
कळमना पोलिस हद्दीत भरतवाडा परिसरातील गल्लीत क्रिकेट खेळण्याच्या वादातून एका युवकाने कुख्यात गुंडाच्या पाठीवर चाकूने वार करीत खून केला. ही घटना शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
अज्जू इब्राहिम शेख असे मृतकाचे नाव असून करण किसन बंजारे असे आरोपीचे नाव आहे. दोघेही मजुरीचे काम करतात.

Nagpur Crime: नागपुर हादरले! चोवीस तासांत तीन खून, उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून युवकांचा खून
Promise Day 2024 :'प्रॉमिस डे' निमित्त जोडीदाराला 'हे' खास वचन देऊन, तुमचे नाते करा घट्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करण आणि त्याचे मित्र परिसरात खेळत असताना, तिथे अज्जू आला. त्याने क्रिकेट खेळण्यासाठी बॅट हातात घेतली. त्यामुळे करणने त्याला टोकले. यावरून दोघांत वाद झाला. करणने घरातून चाकू आणून अज्जू क्रिकेट खेळत असताना, त्याच्या पाठीवर वार केले. त्यामुळे तो कोसळला. पोलिसांनी त्याला पारडीतील खासगी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. दरम्यान पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले. अज्जूवर ३७६ कलमाखाली गुन्हा दाखल असल्याचीही माहिती आहे.

अशा आहेत यापूर्वीच्या घटना
- व्याजाने दिलेल्या पैशांवरून सनी धनंजय सरुडकर (वय ३३, रा. जलालपुरा, गांधीबाग) व कृष्णकांत भट (वय २४, रा. नंदनवन) या मित्रांची साईबाबानगरात चौघांनी मिळून हत्या केली होती. (Latest Marathi News)
- कपीलनगरात ३ फेब्रुवारीला दारूसाठी पैसे न दिल्याने रेती आणि विटांची विक्री करणारा मंगेश गणेश मेंढे (वय ४५ रा. उन्नती कॉलनी), याचा खून झाला होता. याप्रकरणी दत्तू ऊर्फ राहुल रमेश रामटेके (वय १९ रा. मानवनगर ,टेकानाका)याला पोलिसांनी अटक केली होती.
- रविवारी (ता.४) रात्री शेख फिरोज ऊर्फ पक्या शेख सत्तार (वय २२) याची हत्या करण्यात आली होती.

Nagpur Crime: नागपुर हादरले! चोवीस तासांत तीन खून, उधारीच्या पैशाच्या वाद आणि क्षुल्लक भांडणातून युवकांचा खून
मोठी बातमी! शाहू महाराज लोकसभा निवडणूक लढवणार? 'महाविकास आघाडी'कडून तिकीट मिळण्याची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.