Nagpur Crime : खेळायला जातो सांगून गेला अन् लावला गळफास

वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्माणाधीन नव्या घरात जाऊन बारा वर्षीय मुलाने आत्महत्या केली.
Crime
Crimesakal
Updated on

नागपूर - वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत निर्माणाधीन नव्या घरात जाऊन बारा वर्षीय मुलाने आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना शनिवारी (ता.२) रात्री आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

हर्षीत कृष्णकुमार नायडू (रा. श्रावणनगर, वाठोडा) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो सहाव्या वर्गात शिकत होता. शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास तो शाळेतून घरी परतला. त्यानंतर जेवण करून त्याने आईला खेळण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगितले.

याशिवाय त्यानंतर निर्माणाधीन घराकडे जाणार असल्याचेही तो म्हणाला. मात्र, त्यानंतर बराच उशिरापर्यंत तो घरी न आल्याने वडील कृष्णकुमार (वय ४३) यांनी त्याचा शोध घेतला. मात्र, परिसरात तो आढळला नाही. आईने तो नव्या घराकडे जाणार असल्याचे सांगितले. त्यातून वडिलांसह नातेवाईक निर्माणाधीन घराकडे गेले. तिथे त्याने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले.

अगदी काही तासांपूर्वी हसत खेळणाऱ्या हर्षीतला गळफास घेतलेला बघून त्याची आई तिथेच कोसळली. नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून मेडिकलमध्ये नेले असता, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. मात्र, त्याने हा निर्णय का घेतला वा नेमके काय? घडले याबाबत अद्याप खुलासा झाला नसल्याने वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

गळफासासाठी आईची ओढणी

हर्षितने ज्या ओढणीने गळफास घेतला, ती ओढणी त्याच्या आईचीच होती. विशेष म्हणजे, खेळायला जात असल्याचे सांगतांना त्याने ही ओढणी केव्हा आणि कशी नेली, याबाबत त्याचा आईलाही कळले नाही. त्यामुळे ती ओढणी बघून त्यांनाही धक्का बसला. हर्षित हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()