Nagpur Crime Murder Due to Girl Friend Conflict: शहरात खुनांचे सत्र संपता संपत नसून अजनीतील नाईकनगर रिंगरोडवरील समीर बारसमोर मुलीच्या वादातून तिघांनी दिवसा ढवळ्या एका तडीपार गुंडाचा खून केला. ही घटना बुधवारी (ता.१४) दुपारी बाराच्या सुमारास घडली. नवीन पोलिस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील आतापर्यंतचा हा नववा खून आहे.
सूरज बिहारी ऊर्फ अमित महतो (वय २६ रा. बालाजीनगर) असे खून झालेल्या तडीपार गुंडाचे नाव असून विपिन राजकुमार गुप्ता (वय २६ रा. बालाजीनगर), अनिल शाहू (वय २६) आणि विजय गुप्ता (वय २७, दोन्ही रा. नाईकनगर) अशी आरोपींची नावे आहे. सूरज हा बिहारी गॅंगचा म्होरक्या असून त्याला चार महिन्यांपूर्वी तडीपार करण्यात आले होते. विपिनही गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर बस स्थानकावर झालेल्या खुनाच्या कटात सहभाग असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी अकराच्या सुमारास सूरजचे विपिनशी फोनवर बोलणे झाले. त्यावेळी सूरजने विपिनला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. विपिननेही धमकीला जुमानत नसल्याचे सांगितल्याने तो अधिकच भडकला. सूरजने ‘कुठे आहे आता तुला बघतो’ असे म्हणताच, विपिनने रिंगरोडवरील समीर बारसमोर असल्याची माहिती दिली.
सूरज तिथे काही मित्रांसोबत गेला आणि विपिनची कॉलर पकडून तू शिवीगाळ का केली अशी विचारणा करीत मारहाण करू लागला. तिथे असलेल्या विपिनच्या मित्रांनी सूरजला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकत नसल्याने त्यांनी शस्त्रासह सूरजवर वार केले.(Latest Marathi News)
विपिननेही त्याच्या पोटावर, छाती आणि पाठीवर वार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सूरज इतरत्र पळू लागला. मात्र, त्याला गाठून संपविले आणि सर्वजण पसार झाले. ही माहिती पोलिसांना मिळताच निरीक्षक अशोक भंडारे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलला पाठवला. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत, विपिनसह त्याच्या दोन साथीदाराला ताब्यात घेतले.
युवतीवरून वाद
विपिन आणि सूरज हे मित्र होते. विपिनची एक मैत्रीण होती. ती सूरजच्याही संपर्कात आली. त्यामुळे तिने विपिनशी बोलणे सोडले होते. त्यातून दोघांमध्येही वाद झाला होता. काही दिवसांपूर्वी या मैत्रिणीने सूरजशीही बोलणे बंद केले. विपिनमुळेच तिने बोलणे सोडल्याचा त्याचा समज झाल्याने तो चिडला होता. त्यामुळे त्याने विपिनला भेटण्यासाठी बोलाविले. त्यानंतर त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यातून हे प्रकरण घडल्याची चर्चा परिसरात होती. (Latest Marathi News)
गुन्हेगारांवरील वचक संपला?
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शहरात खुनाची मालिका सुरू आहे. जुन्या पोलिस आयुक्तांनी गुंडांवर निर्माण केलेला धाक आता संपल्याचे दिसून येत आहे. गुंड शहरात निर्धास्तपणे फिरत आहेत. दुसरीकडे चोऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. मागच्या आयुक्तांच्या काळात सुरू असलेल्या घरफोड्यांचे सत्र कायम असल्याचे दिसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.