नागपूर : चारित्र्यावर संशय घेत हातोड्याने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना नंदनवन झोपडपट्टी गल्ली नं.१२ मध्ये घडली. अर्चना भारस्कर (३८) असे मृतक महिलेचे नाव आहे. तर रमेश मोतीराम भारस्कर (४८) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. रमेश रात्रभर मृतदेहाजवळ झोपला आणि सकाळी घराला कुलूप लाऊन निघून गेल्यानंतर ही घटना उजेडात आली. रमेशला दारूचे व्यसन आहे. दारूच्या नशेत तो घरी घेऊन पत्नीशी वाद घात होता.
भांडण करून मारहाण करीत होता. दोघांना पुष्पा (१०) आणि त्रिशा (५) दोन मुली आहेत. पत्नी अर्चनाचे वस्तीतील एका युवकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय रमेश याला होता. त्यावरून पती-पत्नीत नेहमी वाद व्हायचे. अर्चनाने केवळ वस्तीतील ओळखी असल्यामुळे बोलत असल्याचे सांगत होती. मात्र, तो नेहमी पत्नीला मारहाण करीत होता.
त्यामुळे कंटाळून ती गेल्या ६ वर्षांपूर्वी माहेरी अमरावती शहरात निघून गेली. काही महिन्यांपूर्वी रमेश याची प्रकृती बिघडली. त्यामुळे नातेवाइकांनी अर्चनाची मनधरणी केली आणि परत बोलावले. पतीच्या आजारपणात तिने साथ देत उपचार केले. रमेश गेल्या आठवड्यापासून अर्चनाला खूप मारहाण करीत होता. त्यामुळे सोमवारी ११ वाजेपर्यंत ती दोन्ही मुलींसह दिराकडे होती.
रात्रभर मृतदेहाजवळ झोपला
पुष्पाला दिराकडे सोडून अर्चना त्रिशाला घेऊन रात्री परत आली. मध्यरात्रीच्या सुमारास रमेशने पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार करीत खून केला. रात्रभर मृतदेहाजवळ झोपला आणि सकाळी घराला कुलूप लाऊन निघून गेला. सकाळी ही घटना उघडकीस आली. नंदनवनचे ठाणेदार विजय नाईकवाड यांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.