Nagpur Juvenile Involved in Serious Crime: शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. घरफोडी असो वा लुटपाट किंवा खुनाचा प्रयत्न असो की खून यामधील आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला आहे.
शहरातील गेल्या वर्षांत झालेल्या विविध घटनांमध्ये जवळपास चारशेहून अधिक अल्पवयीन मुलांवर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुन्हेगारी जगतात प्रवेश करणारी ही अल्पवयीन मुले येणाऱ्या काळात शहरातील गुन्हेगारी विश्वात अधिक सक्रिय होण्याची भीतीही निर्माण झाली आहे.
शहरातील पाटणकर चौकातील बालसुधारगृहातून सहा अल्पवयीन मुले फरार झाल्याची घटना २४ डिसेंबरला समोर आली होती. या सहाही अल्पवयीन गुन्हेगारांनी शहरात उच्छाद घातल्याची बाब समोर आली होती.
यापूर्वीही ९ जानेवारीला महिलेच्या खुनाच्या आरोपाखाली एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. शिवाय सक्करदरा आणि पारडीतील दरोड्यामध्येही एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने ज्या घटनेमध्ये तीन ते चार आरोपी असतात, त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सातत्याने अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळल्याचे दिसून येते. (Latest Marathi News)
घरची परिस्थिती आणि झटपट पैसा यातून अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळताना दिसून येतात. गेल्या दोन वर्षात राज्यात १५ ते १७ वयोगटातील अल्पवयीन मुलांमध्ये त्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
एकट्या पुणे, नागपूर आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये त्याची संख्या २०२२ मध्ये दीड हजारावर होती. त्यात नागपुरात ३०६ अल्पवयीन मुलांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली. २०२३ या वर्षांत राज्यात ती संख्या दोन हजारावर गेली आहे. २०२३ मध्ये एकट्या नागपुरात चारशेहून अधिक अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी विविध गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.
दृष्टिक्षेपात काही घटना
१ डिसेंबरला बजाजनगर परिसरातून अल्पवयीन आरोपीने चोरली कार, १० डिसेंबरला रेल्वेतून दोन अल्पवयीन आरोपींकडून ८२ चोरीचे मोबाइल जप्त, ७ जानेवारीला सक्करदरा येथील घरफोडीत आरोपी, ९ जानेवारीला जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिलेच्या खुनात अल्पवयीन आरोपीला अटक, फेब्रुवारीला वाठोडा येथील दुहेरी खुनामध्ये अल्पवयीन मुलाचा सहभाग, १० फेब्रुवारीला भवानीनगरात झालेल्या १८ लाखाच्या घरफोडीमध्ये अल्पवयीन आरोपीचा समावेश.(Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.