Nagpur Crime:बनावट दस्तावेज तयार करुन विकायचे भूखंड, दहा जणांच्या टोळीला अटक

बनावट दस्तावेज तयार करून मालमत्ता खरेदी विक्री करणाऱ्या दहा जणांच्या टोळीला अमरावती गुन्हे शाखा युनिट (एक) च्या पथकाने शनिवार १६ मार्च रोजी अटक केली.
Nagpur
Nagpur Esakal
Updated on

Nagpur Fake Documents Gang Arrested: बनावट दस्तावेज तयार करून मालमत्ता खरेदी विक्री करणाऱ्या दहा जणांच्या टोळीला अमरावती गुन्हे शाखा युनिट (एक) च्या पथकाने शनिवार १६ मार्च रोजी अटक केली.

शेर खान हिम्मत खान (रा साजनपुरी खामगाव), विजयसिंह जानकीराम बलोदे रा अकोला, कैलास जानकीराम बलोदे, सुनील मधुकर मोरवाल, अन्सार खान इब्राहिम खान (खामगाव जिल्हा बुलडाणा), कल्पेश ऊर्फ निक्की रमेश बोहरा, रमेश महादेव थुकीकर, कृष्णा सुनील मलीये, अतुल संजय अंकुरकार, सय्यद जफर सय्यद नासिर (रा. वडाळी अमरावती अशी अटक झालेल्या दहा जणांची नावे आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे सय्यद सफर सय्यद नासिर वगळता दोघेजण बुलडाणा जिल्ह्यातील तर उर्वरित सात जण अकोला जिल्ह्यातील रहिवासी आहेत असे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री गोरखनाथ जाधव यांनी सांगितले. सदर गुन्ह्यासारखेच यापूर्वी सुद्धा अशा बनावट दस्तऐवज बनवून लोकांचे भूखंड या टोळीने दुसऱ्यांना विकल्याचे तपासामध्ये उघडकीस आले. (Latest Marathi News)

शहरातील सय्यद हिसामुद्दिन तौसीफ रा. अमरावती यांनी शहर कोतवाली पोलिसात दिलेल्या तक्रारीत, त्यांचे सासरे मोहम्मद इकबाल बुरे खान यांचे नावाने मासोद येथे दहा एकर शेती आहे. सन २०१९ मध्ये ते मयत झाले. १५ मार्च २०२४ रोजी दुय्यम सहनिबंधक अमरावती येथून त्यांच्या सासऱ्यांचे नावे असलेल्या शेती विक्रीचा व्यवहार होत आहे. असे कळले. यावेळी त्यांनी माहिती जाणून घेतली असता, संशयित दहा जणांनी फौजदारी कट रचून त्यांचे मयत सासरे असून सुद्धा त्यांच्या नावाने दुसरा इसम तसे उभा करून व त्यावेळेस त्यांचे शेताची विक्री करण्याचा कट रचला होता.

Nagpur
Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं सावट, नागपूरसह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

काझी सय्यद हिसामुद्दीन यांनी तातडीने कोतवाली पोलिसांना बाबत तक्रार दिली. फसवणूक विश्वासघात बनावट दस्तऐवज तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीष वाकोडे व निरीक्षक प्रकाश धपाटे यांच्या पथकाने सदर टोळीला अटक केली आहे. (Latest Marathi News)

Nagpur
Hatkanangle Lok Sabha 2024: "७ मे सर्वजण साथ द्या...", राजू शेट्टी मैदानात उतरले, उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केलं ट्वीट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.