Nagpur News : गांजा, एम.डी. ड्रग्जचा विळखा

तस्करीत दुपटीने वाढ : पोलिसांसमोर आव्हान
crime news
crime news sakal
Updated on

नागपूर : शहरात गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात अंमती पदार्थांच्या तस्करीचे गुन्हे उघडकीस येत आहेत. मात्र, या गुन्‍ह्यांमध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींचा विचार केल्यास तरुणाईमध्ये गांजा तर व्यापाऱ्यांमध्ये एम.डी. ड्रग्ज (मेफेड्रोन) सेवन करण्याचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

तरुणाईमध्ये वाढलेली व्यसनाधीनता ही अंमली पदार्थाची विक्रीचे सर्वात मोठे कारण आहे. त्यातून शहरात मोठ्या प्रमाणात गांजा, चरस, ब्राऊनशुगर, एम.डी.ड्रग्जची विक्री केल्या जाते. महाविद्यालयीन तरुणांना हेरुन त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विक्री केल्या जाते. त्यातूनच शहरात गेल्या वर्षी १ जानेवारी ते ३१ डिसेंबरदरम्यान १ कोटी ३ लाख ४८ हजार ६३३ रुपये किमंतीचा मुद्देमाल एनडीपीएसच्या पथकाने जप्त केला. यामध्ये गांजाचे प्रमाण २९९ किलो ३६८ ग्रॅम तर ५१३ ग्रॅम एम.डी. ड्रग्जचा समावेश होता. मात्र, यावर्षी केवळ सात महिन्यात पथकाने ३५७ किलो ४९० ग्रॅम गांजा तर ४२९ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही अंमली पदार्थांच्या तस्करीमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

एम.डी.ची सर्वाधिक चलती

नागपुरात साधारणतः मुंबईतून एम.डी. ड्रग्ज आणि ओडिशातून गांजाची तस्करी होताना दिसून येते. पेडलरच्या माध्यमातून एम.डी. ड्रग्ज आणण्यासाठी खासगी वाहनाचा उपयोग केल्या जातो. याशिवाय रेल्वेतून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होताना दिसून येते. एम.डी. ड्रग्ज साधारणतः ३ हजार रुपये ग्रॅमपासून सुरू होत असल्याने त्याची नशा करणारेही बडी आसामी असते. त्यामुळे व्यापारी आणि उच्चभ्रू घरातील तरुणांचा त्यात अधिक समावेश होतो. शिवाय गांजा अगदी शंभर रुपयात मिळत असल्याने महाविद्यालयीन तरुणांमध्ये त्याचे सेवन करण्याचे प्रमाण अधिक आहे.

नेहमी बदलतात पेडरल

एम.डी.ड्रग्जच्या विक्रीसाठी प्रत्येकवेळी नव्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत असल्याचे दिसून येते. पोलिस रेकॉर्डवर हा व्यक्ती नसल्याने त्याच्या तस्करीबाबत माहिती मिळणे जवळपास कठीण असते. त्यामुळे शहरात सहजपणे एम.डी.ड्रग्ज आणण्यात पेडलर यशस्वी होताना दिसून येतात.

अशी आहे आकडेवारी (२०२१)

  • अंमली पदार्थ - गुन्हे - जप्त साठा - किंमत - आरोपी

  • गांजा - ६२ - २९९ किलो - ४४, ७८,५८२ - ८०

  • एम.डी. ड्रग्ज - १३ - ५७२ ग्रॅम - ५७,३१,९०० - २४

  • २०२२ (१ जानेवारी ते ३१ जुलै)

  • गांजा - ३५ - ३५७ किलो - ४९० ग्रॅम - ५३,६२,२८५ - ५०

  • एम.डी. ड्रग्ज - १२ - ४२९ ग्रॅम ४३, १९,३०० - २३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.