Nagpur Hotel Rating Scam: हॉटेलच्या रेटींगचा टास्क अन् क्षणात गमावले १७ लाख, नागपुरात टेलिग्राम स्कॅमचा आणखी एक बळी

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेलच्या नावाची लिंक देऊन रेटिंग देण्याच्या टास्कच्या नावाखाली साडेसतरा लाख रुपयाने फसवणूक केली.
Nagpur Hotel Rating Scam: हॉटेलच्या रेटींगचा टास्क अन् क्षणात गमावले १७ लाख, नागपुरात टेलिग्राम स्कॅमचा आणखी एक बळी
Updated on

Nagpur Fraud Case Hotel Rating: वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेलच्या नावाची लिंक देऊन रेटिंग देण्याच्या टास्कच्या नावाखाली साडेसतरा लाख रुपयाने फसवणूक केली. ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ते २५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान घडली.

मयुर मोरेश्वर सावरबांधे (३०, रा. शिवसुंदरनगर, दिघोरी दहन घाटाजवळ) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मयुर हे घरी असताना त्यांच्या मोबाईलवर सन मार्केटिंग ग्रुपमध्ये त्यांना जॉईन केल्याचा मॅसेज आला. त्यात हॉटेल नावाची लिंक देऊन रेटिंग केल्यास प्रति रेटिंग ५० रुपये मिळतील, असे नमूद केले होते.

त्यामुळे ते दिलेल्या टेलिग्राम लिंकवर सायबर चोरट्याने त्यांना ॲड झाले. त्यानंतर त्यांनी २ हजार रुपये अकाऊंटमध्ये जमा करून टास्क पूर्ण केला. त्यावर आरोपीने त्यांना नफ्यासह २ हजार ८०० रुपये पाठविले. यामध्ये आणखी पैसा गुंतविल्यास अधिक नफा होईल असे आमिष दाखविले. (Latest Marathi News)

त्यामुळे सुरुवातीला मयुर यांनी वेगवेगळ्या अकाऊंटवर छोटी रक्कम गुंतविली. आरोपीने त्यांना खात्यात वाढीव रक्कम पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे मयुर यांनी वेगवेगळ्या खात्यावर १६ लाख ६३ हजार ५७० रुपये पाठविले. त्यानंतर मयुर यांनी रक्कम डिपॉझिट करण्यास मनाई करून रक्कम परत मागितली.

Nagpur Hotel Rating Scam: हॉटेलच्या रेटींगचा टास्क अन् क्षणात गमावले १७ लाख, नागपुरात टेलिग्राम स्कॅमचा आणखी एक बळी
Pune News : हॉटेल, पबवर राहणार पोलिस पथकांचा ‘वॉच’ ; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

परंतु आरोपीने त्यांना रक्कम परत न करता त्यांचा विश्वासघात करून त्यांची ऑनलाईन फसवणूक केली. मयुर यांनी दिलेल्या तक्रारीवरू वाठोडा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध आयटी ॲक्टनुसार नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Latest Marathi News)

Nagpur Hotel Rating Scam: हॉटेलच्या रेटींगचा टास्क अन् क्षणात गमावले १७ लाख, नागपुरात टेलिग्राम स्कॅमचा आणखी एक बळी
WhatsApp Fact Check Helpline : डीपफेकला बसणार आळा! MCA आणि मेटा मिळून सुरू करणार 'व्हॉट्सअ‍ॅप फॅक्ट-चेक हेल्पलाईन'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.