Nagpur Crime: पूर्व वैमनस्यातून गाळे मालकाचा खून, आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

पूर्व वैमनस्यातून गाळे मालकाचा खून करणाऱ्या दोन आरोपी भाडेकरूंना सत्र न्यायालयाने जन्मठेप, पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
Nagpur Crime
Nagpur Crime Esakal
Updated on

Nagpur Tenant killed Landlord: पूर्व वैमनस्यातून गाळे मालकाचा खून करणाऱ्या दोन आरोपी भाडेकरूंना सत्र न्यायालयाने जन्मठेप, पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीन महिन्यांचा अतिरिक्त कारावास भोगावा लागेल असेही नमूद केले.

संतोष शाहू (वय ३८, रा. पठाण ले-आऊट, प्रतापनगर) आणि लक्ष्मीनारायण ऊर्फ चंदन नायर (वय ६१, रा. गुडधे ले-आऊट, भामटी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर अनिल पालकर यांच्या खून प्रकरणात प्रतापनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

ही घटना ९ नोव्हेंबर २०२० रोजी गोपालनगर परिसरात घडली होती. या परिसरात अनिल पालकर यांची इमारत होती. येथे आरोपी संतोषने भाड्याने गाळा घेतला होता. तेथे तो किराण्याचा व्यवसाय करायचा. तसेच याच इमारतीमधील एका बेकरीत नायर काम करीत होता. ही दोन्ही दुकाने रिकामी करण्यासाठी अनिल यांनी तगादा लावला होता. यावरून त्यांचा वाद सुरू होता. (Latest Marathi News )

घटनेच्या दिवशी सायंकाळी सात वाजता अनिल इमारतीमध्ये आला. तो दारू पिऊन होता. त्याच्या इमारतीसमोर एक महिला नारळ पाणी विकत होती. तो तिला शिवीगाळ करू लागला. यानंतर तो आरोपींनाही शिवीगाळ करू लागला. अखेर दोषींनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपींना दोषी ठरविले. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अभय जिकार यांनी बाजू मांडली.

Nagpur Crime
Mallikarjun Kharge wins Congress presidential elections: काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.