Latest mauda News: परिसरातील पन्नास ते साठ गावांची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी अरोली पोलिस ठाण्यांकडे आहे. ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यावर लगाम लावल्यास कायदा व सुव्यवस्था चोख व सुरळीत सुरू असल्याचे म्हणावे लागेल. पण नजरेआड अवैध धंदे सुरू असून अरोली पोलिस प्रशासनामार्फत त्यावर लगाम लावल्याच्या केवळ बाता मारल्या जात आहे.
एक दोन कारवाया करून आपला ठसका आणि दबाव टाकण्याच्या प्रयत्नात ‘चांगभलं’ साधण्याचा तो प्रयत्न आहे. अवैध धंद्यावर अरोली पोलिसांनी अद्याप पकड नसून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांच्या तोंडी एकच सवाल आहे तो म्हणजे अरोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत नेमके चालले तरी काय ?
२६ जानेवारी २००९ या वर्षी अरोली पोलिस चौकीचे ठाण्यात रूपांतर झाले. तेव्हापासून ठाण्याला जवळपास पंधरा ठाणेदार लाभले.