Nagpur Health Update : नागपूर जिल्ह्याला आजारांचा विळखा; चिकनगुनियाचे ५५ तर डेंगीचे ५७ रुग्ण

Nagpur Latest News in Marathi |पावसाळा सुरू होताच चिकनगुनियासारख्या आजारांच्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या ५७ वर तर चिकनगुनियाची रुग्णसंख्या ५५ वर पोचली आहे.
dengue
dengue esakal
Updated on

Nagpur News : पावसाळा सुरू होताच चिकनगुनियासारख्या आजारांच्या रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात डेंगीच्या रुग्णांची संख्या ५७ वर तर चिकनगुनियाची रुग्णसंख्या ५५ वर पोचली आहे. यामुळे महापालिकेसह जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा हादरली आहे. यावर प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे.

डेंगी, चिकनगुनिया या साथीच्या आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडिस इजिप्ती’ डास ‘झिका’ विषाणूंचाही वाहक आहे. तर सध्या डेगींचे आणि चिकनगुनियाचा प्रकोप उपराजधानीसह नागपूरच्या ग्रामीण भागात सुरू झाला असून चिकन गुनियाचे जिह्ल्यात ५५ रुग्ण तर डेंगीचे ५७ रुग्ण आढळले. यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरातल्या बहुतांश वस्त्यांमध्ये डासांचा उच्छाद वाढला आहे. घरोघरी तापाचे रुग्ण आढळत आहेत. धरमपेठ, मंगळवारी झोनमधील विविध वस्त्यांमध्ये चिकनगुनियाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. रहिवासी वसाहतीत डासांची उत्पत्ती वाढली आहे.

चिकनगुनिया आजाराने थैमान घातले आहे. या दोन झोनमधील वस्त्यांमध्ये चार घर सोडून किमान एकाने खाट धरल्याचे चित्र आहे. या दोन्ही झोनमधील वसाहतींमध्ये कुटुंबातल्या सर्व व्यक्तींना कुठला ना कुठला आजार जडल्याने हा भाग आजारांचे माहेरघर झाला आहे.

गतवर्षी राज्यात १ जानेवारी २०२२ ते ३० जुलै २०२२ या सात महिन्यांत चिकन गुनियाचे ५०४ रुग्ण आढळले होते. यामुळेच चिकनगुनियाचे भय वाढले आहे. चिकनगुनियाचे रुग्ण आढळल्याच्या वृत्ताला महापालिका, जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

नागपूर जिल्ह्यात डेंगी

  • शहर - २९

  • ग्रामीण -२८

चिकन गुनिया

  • शहर- ५२

  • ग्रामीण -३

पावसामुळे चिकनगुनिया-डेंगीचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वत्र कीटकनाशक फवारणीसह जनजागृती केली जात आहे. रुग्ण आढळलेल्या भागात सर्वेक्षण करण्यात येत आहेत. नागरिकांनाही घरात किंवा घराच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. तसेच घरातील परिसर स्वच्छ ठेवण्यासोबतच आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.

-डॉ. दीपक सेलोकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.