नागपूर जिल्ह्यात ४६६ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकूण ९६९ रस्ते अपघात झाले असून त्यामध्ये ४४५ अपघातांमध्ये ४६६ जण ठार झाले.
Accident News
Accident Newsesakal
Updated on

नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकूण ९६९ रस्ते अपघात झाले असून त्यामध्ये ४४५ अपघातांमध्ये ४६६ जण ठार झाले तर ९०१ जण गंभीर जखमी झाले होते. रस्ते अपघातांच्या संख्येत घट व्हावी आणि वाहनचालकांचा जीव वाचावा यासाठी नागपूर ग्रामिण पोलिसांनी शालेय मुलांना वाहतुकीचे नियम आणि धडे देण्यासाठी विशेष उपक्रम सुरू केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी निवडक पत्रकारांशी चर्चा करताना दिली. (Nagpur District Road Accident Updates)

गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत गतवर्षी रस्ते अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच रस्ते अपघातातही सर्वाधिक बळी गेले आहेत. ग्रामीण भागात वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. जवळपास ९० टक्के दुचाकीचालक हेल्मेट घालत नाहीत तर वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. तसेच ग्रामिण भागात वाहतुकीच्या शिक्षणाचा अभाव असल्यामुळे वाहनचालक बेदरकारपणे वाहने चालवितात. त्याचा परिणाम वाहतूक नियंत्रण व्यवस्थेवर होते.

Accident News
नागपूर : लक्षणे नसलेले बाधित वाऱ्यावर; कुटुंबीयांची धाकधूक वाढली

जिल्ह्यात सर्वाधिक अपघात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग असलेल्या सावनेर विभागात झाले असून २२१ रस्ते अपघातात ९९ जणांचा मृत्यू आणि १८५ जण जखमी झाले आहेत. तर काटोल विभागात रस्त्याची दयनिय अवस्था असल्यामुळे १९४ अपघातात ९० जण ठार तर १८४ जण जखमी झाले. उमरेड विभागात १६१ अपघातात ८७ जण ठार तर १७७ जण जखमी झाले आहेत.

कन्हान विभागात १४९ रस्ते अपघातात ६५ जण ठार तर १३२ जण जखमी झाले आहेत. तर नागपूर विभागात १४८ रस्ते अपघातात ६२ जण ठार तर १३ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद ग्रामिण पोलिसांकडे आहे. या उपक्रमाला अतिरिक्त अधीक्षक राहुल माकनीकर, पोलिस उपाधीक्षक संजय पुरंदरे, पीआय विजय माहुलकर आणि ओम कोकाटे उपस्थित होते.

शालेय विद्यार्थी ‘टार्गेट’

ग्रामिणमध्ये १ हजार शाळा असून त्यामध्ये १ लाख ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शालेय विद्यार्थी हे भविष्यातील दुचाकी, चारचाकी वाहनचालक आहेत. त्यामुळे मुलांमध्ये वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे बीज रूजविल्या जात आहेत. देशाचे भविष्य असलेल्या मुलांना भविष्यात वाहन चालविताना त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून पोलिस काळजी घेत आहेत. मुलांना वाहतूकीचे धडे दिल्यामुळे ते आपापल्या पालकांना वाहतूकीचे नियम समजून सांगून त्यांच्याकडून पालन करून घेण्यास बाध्य करू शकतात. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना धडे देतांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे.

Accident News
रस्त्याचे काम करणाऱ्या वाहनाने पादचाऱ्यास चिरडले; एकाचा जागीच मृत्यू

गोवंशाच्या वाहतूकीचा ‘धसका’

गोवंशाची ग्रामिणमधून मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत होती. त्यामुळे अधीक्षक विजयकुमार मगर यांनी विशेष अभियान राबविले. त्यात ९५ गुन्हे दाखल करून १९२ गोतस्करी आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांना अटक केली. ३००२ गोवंशाची तस्करांच्या तावडीतून सुटका केली आणि दहा कोटी ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.