Nagpur: दारु पिताच संचारली ताकद, पोलिसांना फोन लावून म्हणाला, 'डीएसपीला गोळ्या घालायच्यात'

होळीचा रंगात मद्यपान करून एका दारूड्याने थेट ११२ क्रमांकावर फोन करून सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांना गोळ्या घालण्याण्यासाठी पोलिसांनाच मदत मागितली.
Nagpur News
Nagpur News Esakal
Updated on

Nagpur Drunken Man asked Police to kill Officer: होळीचा रंगात मद्यपान करून एका दारूड्याने थेट ११२ क्रमांकावर फोन करून सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांना गोळ्या घालण्याण्यासाठी पोलिसांनाच मदत मागितली. त्याला पारडी पोलिसांनी अटक केली.

किसन मंगुलाल राठोड ( वय ५३, रा. पारडी) असे या व्यक्तीचे नाव आहे. होळी म्हटली की, रंग आणि मित्रांची मैफल हे एक जबरदस्त कॉम्बिनेशन असते. इकडे मित्रांसोबत रंग खेळत असताना तिकडे मद्याचे घोट घेऊन थिरकने आणि मौजमजा करणे हा अनेकांचा बेत असतो. अनेकांच्या बैठक आणि गप्पागोष्टीही रंगतात. कही दारूच्या नशेत विचित्रपणा करताना दिसून येतात. अशाच प्रकारे दारूच्या नशेत टून्न होत एकाने सोमवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास डायल ११२ वर कॉल लावला.

यावेळी त्याने चक्क सहाय्यक पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त यांना गोळ्या घालायच्या आहे, त्यासाठी पोलिसांना पाठविण्याची मागणी केली. या प्रकाराने खळबळ उडाली. नियंत्रण कक्षात असलेल्या पोलिसाने ही माहिती संबंधित ठाण्यातल्या पोलिसांना दिली. (Latest Marathi News)

याशिवाय सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष खांडेकर आणि परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त निकेतन कदम यांना दिली. दरम्यान पारडी पोलिसांनी किसन राठोड याला ताब्यात घेतले. यावेळी अतिदारूचे सेवन केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.

Nagpur News
UBT First List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; पुन्हा कोणाला मिळाली संधी? पाहा 17 उमेदवारांची नावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.