Nagpur Electric Shock Accident: पतंग काढताना भाजलेला 'तो' मुलगा अजूनही अत्यावस्थ, डॉक्टरांनी वर्तवली भीती

पंतग काढताना वीजेचा धक्का लागून भाजलेल्या मुलाची प्रकृती नाजूक असून पुढील ७२ तास त्याला जंतूसंसर्गाचा धोका वर्तवण्यात आला आहे.
Nagpur Electric Shock Accident: पतंग काढताना भाजलेला 'तो' मुलगा अजूनही अत्यावस्थ, डॉक्टरांनी वर्तवली भीती
Updated on

Nagpur High Voltage Shock Survivor: पतंग उडविण्याच्या नादात विद्युत तारांतून शॉक लागल्याने ४० ते ६० टक्के भाजलेल्या १० वर्षीय शाळकरी मुलाची प्रकृती तिसऱ्या दिवशीही नाजूक होती. वीज तारांच्या शॉर्टसर्किटमुळे कपड्यांनी पेट घेतल्यानंतर गंभीररित्या भाजलेल्या या मुलाच्या त्वचेखाली मांसपेशी भाजल्या गेल्या आहेत.

मांसपेशीत खोलवर जखमा झाल्या आहेत. यामुळे जंतूसंर्गाची जोखीम आहे. मेडिकलमधील प्लास्टिक सर्जरी विभागातील तज्ज्ञांनी शुक्रवारी रात्रीपर्यंत त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली. मात्र त्याच्या जखमा इतक्या गंभीर आहेत, की जोवर त्या सुकत नाहीत, तोवर त्याची प्रकृती नाजूक आहे.

मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्जरी केल्यानंतर त्याला तुर्तास व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीत अंशतः सुधारणा होत असली तरी तुर्तास काही सांगता येत नाही, असे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले.

बुधवारी पतंगाच्या नादात समतानगरातील रहिवासी मुलगा वीज तारांना चिकटल्याने गंभीररित्या भाजला गेला. जखमांमुळे त्याला आधीच उजवा पाय गमवावा लागला असून त्याची प्रकृती नाजूक आहे. जंतूसंसर्गाचा धोका लक्षात घेता तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरी त्याच्यासाठी पुढचे ७२ तास जोखमीचे आहेत. (Latest Marathi News)

Nagpur Electric Shock Accident: पतंग काढताना भाजलेला 'तो' मुलगा अजूनही अत्यावस्थ, डॉक्टरांनी वर्तवली भीती
Weather Update: गारठा वाढणार! राजधानी दिल्लीचा पारा घसरला; आणखी पाच दिवस धुके तर 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.