EV Charging Station: विजेवरील वाहने आता धावणार सुसाट! नागपुर शहरात चार्जिंग पॉईंट्स वाढणार,विक्री पाच टक्क्यांनी वाढली

वाहनांना चार्ज करण्यासाठी ठिकठिकाणी पॉइंट मिळावेत म्हणून महामेट्रोने चार्जिंग पॉइंट उभारले आहेत. महापालिकाही चार्जिंग पॉइंटस लावण्यावर भर देत आहे.
Nagpur
Nagpur Esakal
Updated on

Nagpur City EV Vehicles Charging Points Installation: काही वर्षांपासून इंधनावर धावणाऱ्या वाहनांऐवजी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर बऱ्यापैकी दिसत आहेत. याच वाहनांना चार्ज करण्यासाठी ठिकठिकाणी पॉइंट मिळावेत म्हणून महामेट्रोने चार्जिंग पॉइंट उभारले आहेत. महापालिकाही चार्जिंग पॉइंटस लावण्यावर भर देत आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात इलेक्ट्रिक गाड्या सुसाट धावताना दिसणार आहेत.

शहरात इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर आणि एकदा रिचार्ज केल्यानंतर चांगला मायलेज मिळत असल्याने आता लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदीस पसंती देत आहेत.

नागरिक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी सोबतच ई-चारचाकी वाहनांच्या खरेदीसाठी पुढे येऊ लागले आहेत. तसेच टूरिस्ट टॅक्सी, डिलिव्हरी वॅन्स, कार्ट गुड‌्सच्या तुलनेत ई-रिक्षाच्या खरेदीतही वृद्धी दिसत आहे. ई-वाहनांची गती वाढलेली असल्याने ग्राहकांचा कल इव्ही गाडीकडे वळला आहे. वाढती मागणी लक्षात घेता मोठ-मोठ्या नवीन कंपन्या बाजारात आल्या आहेत.(Latest Marathi News)

आगामी दिवसांत राहील धूम

शहरांत वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सरकार इलेक्ट्रिक वाहनांचा चालना देत आहे. शहरातील तिन्ही परिवहन विभाग कार्यालयात नोंदणी होणाऱ्या वाहनांची संख्या पाहिल्यास वर्ष २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये अधिक वाहनांची नोंद झालेली आहे. वर्ष २०२२ मध्ये ग्रामीण आरटीओत १,६२१ तर वर्ष २०२३ मध्ये यात वाढ होत ३,१०२ वाहनांची नोंदणी झाली.

Nagpur
Election Story: किस्से निवडणुकीचे! पहिली निवडणूक कशी होती? पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कसा हटवला?

याचप्रमाणे वर्ष २०२२ मध्ये ईस्ट आरटीओत ९००१ वाहने रजिस्टर्ड झाली होती, तर २०२३ मध्ये यात वाढ होत ९,२०० वर आकडा पोहोचला. वर्ष २०२२ मध्ये शहर आरटीओत २८०६ वाहन रजिस्टर्ड झाले होते, ते वर्ष २०२३ मध्ये २,८७० वर पोहोचले. एकंदरीत वर्ष २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये १,७४४ नवीन ई-इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. आरटीओत नोंद आकडे पाहता येणाऱ्या काळात शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही या वाहनांची क्रेझ राहील. (Latest Marathi News)

Nagpur
Lok Sabha Election 2024: लोकसभेसाठी राज्यातून 'या' उमेदवारानं भरला पहिला अर्ज; कुठला मतदारसंघ? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.