Nagpur : रोजगारासाठी सरपंचांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत झिजवले उंबरठे; जगण्यासाठी दिव्यांग ज्येष्ठ नागरिकाची धडपड, प्रशासनाचे दुर्लक्ष

५९ वर्षीय रवींद्र कर्णबधिर असून, त्यांची पत्नीही (अरुणा) बधिर आहे. त्यांना मुलं नाही.
nagpur
nagpur sakal
Updated on

नागपूर - दिव्यांग ज्येष्ठ नागरिक असलेले परसोडी, श्रमिकनगर येथे राहणारे रवींद्र गुजर यांनी उदरनिर्वाहाचे साधन व शासकीय योजनांचा फायदा मिळावा यासाठी सरपंचांपासून अधिकारी, आमदारासह थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत उंबरठे झिजवले. मात्र शासनाकडून ना दुकानासाठी जागा मिळाली, ना निराधार योजनेचा लाभ मिळाला. ‘मला आणखी किती दिवस चप्पल झिजवाव्या लागतील?’, असा संतप्त सवाल त्यांनी प्रशासनाला केला आहे.

५९ वर्षीय रवींद्र कर्णबधिर असून, त्यांची पत्नीही (अरुणा) बधिर आहे. त्यांना मुलं नाही. डोंगरगाव येथील एका चिकन-मटणच्या दुकानावर रोजमजुरी करून ते उदरनिर्वाह करायचे. दुसऱ्याकडे काम करण्यापेक्षा स्वतःचे दुकान लावण्यासाठी त्यांनी २००३ मध्ये सातगाव (खापरी) ग्रामपंचायतीकडे दुकान किंवा भूखंडासाठी अर्ज केला होता.

रोजगारासाठी सरपंचांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत उंबरठे झिजवले

मात्र अजूनपर्यंत अर्जावर विचार झाला नाही. त्यांना प्रशासनाने हॉकिंग परवाना दिला. परंतु चालत्या-फिरत्या दुकानावर मटण विक्री करणे शक्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

खामला येथे जागा मिळावी, यासाठी त्यांनी लक्ष्मीनगर झोनकडे जागेसाठी अर्ज केला आहे. तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली. वारंवार विनंत्या व अर्ज करून कुठेच त्यांना न्याय मिळाला नाही. कार्यालयांच्या चकरा मारून अक्षरशः त्यांच्या चपला झिजल्या. पण निगरगट्ट प्रशासनावर परिणाम झाला नाही. त्यामुळे नाईलाजाने ते संविधान चौकात तीन दिवस उपोषणाला बसले. मात्र तेथेही आपल्याला कुणीच भेटायला आले नसल्याचे दुःख त्यांनी बोलून दाखविले. शासनाने माझ्या अडचणी दूर कराव्यात, अशी त्यांची एकच मागणी आहे. निदान पत्नीला एखाद्या बचतगटाच्या माध्यमातून काम मिळाल्यास आमच्या दोनवेळच्या जेवणाची सोय होईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

nagpur
Sasoon Hospital : रुग्णालयातील बहुतांश कैद्यांची होणार कारागृहात रवानगी

कर्णयंत्राची आवश्यकता

रवींद्र व अरुणाची समस्या एवढ्यावरच संपत नाही. त्यांना कर्णयंत्राची गरज आहे. त्यासाठी त्यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयात अर्ज केला. एम्समध्येही चकरा मारल्या. दोन्ही ठिकाणी आपल्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचे रवींद्र यांनी सांगितले

वर्षभरापासून बेरोजगार

रवींद्र यांना वर्षभरापूर्वी ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या पत्नीलाही म्युकर मायकोसिस आजार झाला होता. रवींद्र यांच्यावर अँजिओप्लास्टी व अँजिओग्राफी झाली. तेव्हापासून ते बेरोजगार झाले आहेत. महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत शस्त्रक्रियेचा खर्च मिळावा, यासाठीही त्यांनी जागोजागी हातपाय मारले. दुर्दैवाने तिथेही नशिबाने त्यांना साथ दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.