Nagpur Crime: नागपुरात 'स्पेशल २६'! गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रोकड केली जप्त, पण पोलीस निघाला 'तोतया'

मध्यप्रदेशातून गुटखा विक्रीसाठी आणणाऱ्याला कारवाईची धमकी देत त्याच्याकडून साडेचार लाख रुपये आणि गुटखा लंपास केला. याप्रकरणी तोतया पोलिसासह ग्रामीण भागातील पोलिसासह पाच जणांना तहसिल पोलिसांनी अटक केली.
Nagpur Crime: नागपुरात 'स्पेशल २६'! गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रोकड केली जप्त, पण पोलीस निघाला 'तोतया'
Updated on

Fake Police Officer Arrested in Nagpur: मध्यप्रदेशातून गुटखा विक्रीसाठी आणणाऱ्याला कारवाईची धमकी देत त्याच्याकडून साडेचार लाख रुपये आणि गुटखा लंपास केला. याप्रकरणी तोतया पोलिसासह ग्रामीण भागातील पोलिसासह पाच जणांना तहसिल पोलिसांनी अटक केली.

या प्रकाराने खळबळ उडाली. हेमराज मोरबा नंदनवार (वय ४४, रा. स्वामीनगर, तांडापेठ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संदीप भिमराव सुरडकर (वय ४०, रा. राऊत नगर, दिघोरी), रितेश महादेव मस्के (वय ३५, रा. ईतवारी, मस्कासाथ, तेलीपुरा), मंगेश तात्याराव सावरकर (वय ४२, रा. ईतवारी, मिरची बाजार, जयभिम चौक, लकडगंज), ग्रामीण मुख्यालयातील पोलिस अंमलदार सचिन दिलीप मेश्राम (वय ३५, रा. टेकानाका), अभिलाष संतोष नामदेव (वय ३०, रा. लाभलक्ष्मी नगर, ४ नं. नाका, कळमना) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमराज भाड्याने मालवाहू वाहन घेऊन मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांकडून तो भाजीपाला खरेदी करून नागपुरात विकतो. काही महिन्यांपासून तो भाजीपाल्याखाली गुटखा आणि तंबाखूची तस्करीही करीत होता. त्यासाठी त्यांनी पांढुर्णा येथे गोदामही घेतले होते. त्याचा मेहुणा तेजस बाजीराव (वय ३५, रा. देवघर मोहल्ला, जगनाथ बुधवारी) हा नागपुरात माल विकण्याचे काम करतो. (Latest Marathi News)


१८ फेब्रुवारीला हेमराज माल आणण्यासाठी चालक प्रवीणसोबत (एमएच ४९-बीझेड १२३६) त्याच्या वाहनात पांढुर्णा येथे गेला होता. त्याने तेथील किराणा व्यापाऱ्याकडून ९० हजार रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू खरेदी केला. भाजीच्या गोण्यांमध्ये माल लपवून नागपुरात आले. २० फेब्रुवारीला पहाटे ५ वाजता तेजसच्या घरी पोहोचला. दोघांनी माल उतरवण्यास सुरुवात करताच तेथे खाकी वर्दी घातलेला एक आरोपी त्याच्या ३ साथीदारांसह तेथे पोहोचला.

Nagpur Crime: नागपुरात 'स्पेशल २६'! गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रोकड केली जप्त, पण पोलीस निघाला 'तोतया'
Rajendra Patni Passed Away: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन; वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आरोपींनी स्वत:ला तहसील पोलिस ठाण्याचे कर्मचारी असल्याचे सांगितले. वाहनात गुटखा असल्याची माहिती असल्याचे सांगून माल रिकामा करण्यात आला. यावेळी कारवाई न करण्याचा बदल्यात १० लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे देण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर आरोपींनी साडेतीन लाख रुपये घेण्याचे मान्य केले.(Latest Marathi News)


हेमराजच्या सांगण्यावरून तेजस त्याच्या घरी गेला. एक आरोपीही त्याचा पाठलाग करून घरात घुसला. तेथे आरोपींनी बॅगेतील संपूर्ण साडेचार लाख रुपये हिसकावून नेले. परत आल्यानंतर तेजसने संपूर्ण रक्कम घेतल्याची माहिती हेमराजला दिली. एका आरोपीने उर्वरित रक्कमही परत करण्यास सांगितले. मात्र, पैसे हिसकावणाऱ्या व्यक्तीने ठाणेदाराशी आधीच बोलल्याचे सांगितले. जप्त केलेला माल दाखवा आणि त्यांना फरार घोषित करा, असेही सांगितले. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी तहसिल ठाण्यात गुन्हा नोंदविला. त्यातून सीसीटीव्ही फुटेज तसासून पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

Nagpur Crime: नागपुरात 'स्पेशल २६'! गुटखा तस्कराकडून ४ लाखांची रोकड केली जप्त, पण पोलीस निघाला 'तोतया'
Rajendra Patni Passed Away: भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने निधन; वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.