Nagpur: बळीराजा पुन्हा संकटात! विदर्भात पुन्हा वादळाचे थैमान, झाडे कोसळली, टिनपत्रे उडाली

Nagpur
Nagpuresakal
Updated on

Nagpur: बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात व यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांना आज रविवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह आलेल्या पावसाने झोडपले. अतिशय वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेत. परिणामी अनक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली. बुलढाणा जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक (ता. देऊळगाव राजा) येथील एका शेतकऱ्याची पपई बाग उद्ध्वस्त होऊन पाच लाखांचे नुकसान झाले.

काल दुपारी २ च्या सुमारास आलेल्या वादळामुळे लोक भयभीत झाले. वादळी वाऱ्याचा वेग एवढा होता की रस्त्यावर चालणाऱ्या वाटसरूंचाही तोल जात होता. रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांनाही तोल सांभाळता येत नव्हता.

Nagpur
Odisha Train Accident : रेल्वेअपघातामागे घातपात? ‘सीबीआय’ चौकशीची ‘बोर्डा’ची शिफारस

सुमारे एक तास चाललेल्या या वादळामुळे झाडे उन्मळून पडली व घरांवरील टिनपत्रे ही उडाले. दुपारी दोन वाजेपासून अचानक वारे वाहू लागलेत. काही वेळातच वाऱ्याचा वेग वाढून जोरदार वादळ सुरू झाले. या वादळात कोणाच्या घरावरील टिनपत्रे उडाली, तर सचिन खंडारे यांच्या घरावरील कपडे, सामान, ताडपत्री उडाली.

वाऱ्यामुळे शिंदी येथील मंदाबाई इटेवाड यांच्या घरासमोरील भले मोठे कडुलिंबाचे झाड उन्मळून पडले. झाडाच्या फांद्या आयूब शहा यांच्या घरावर पडल्यामुळे त्यांच्या घरावरील टीन पत्रे काही प्रमाणात वाकलेत. काही फांद्या विद्युत तारांवरही पडल्यात. परंतु सुदैवाने तार तुटली नाही .

देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) : तालुक्यात तुफान वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले असून दिग्रस बुद्रुक येथील पपई बाग उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान झाले आहे. आज दुपारी चारच्या सुमारास आलेल्या वादळामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली.

या तुफानी वाऱ्यात तालुक्यातील दिग्रस बुद्रुक येथील शेतकरी सय्यद रियाज सय्यद चांद यांच्या पपईची बाग उद्ध्वस्त झाली. पपईची अनेक झाडे तर अक्षरशः अर्ध्यातून कापल्यासारखी तुटलीत.

वाशीम: जिल्ह्यालाही रविवारी दुपारी वादळी पावसाने झोडपून काढले. रिसोड व मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळला. मालेगाव तालुक्यातील अनेक गावात झाडे उन्मळून पडली. अमानवाडी येथे वीज कोसळून तीन जण जखमी झाले आहेत.

Nagpur
Odisha Train Accident : रेल्वेअपघातामागे घातपात? ‘सीबीआय’ चौकशीची ‘बोर्डा’ची शिफारस

दुपारी १ वाजताचे सुमारास रिसोड मालेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. मालेगाव व रिसोड तालुक्यातील अनेक गावात वादळी वाऱ्याने घरावरील टिनपत्रे उडाली. किन्हीराजा परिसरात झाडे उन्मळून पडली.

मालेगाव तालुक्यातील अमानवाडी शिवारात वीज कोसळली. झाडाखाली उभे असलेले तीन जण जखमी झाले आहेत.

दिग्रस (जि यवतमाळ): वादळी वाऱ्‍यामुळे दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भागात निंभा, सावंगा बु. येथील अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. तर काही ठिकाणी मोठमोठी वृक्ष उन्मळून पडली. शहरातील तहसील कार्यालय परिसरातील सुनील हिरास यांच्या घरावर कडुलिंबाचे झाड उन्मळून पडले.

निंभा येथील अजय लोखंडे यांच्या घरावरील टिनपत्रे उडाली. टिनावरील दगड पायावर पडल्याने ते गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वादळी वाऱ्‍यामुळे वीज तारा तुटल्याने दिग्रस शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.