Nagpur Flood : तातडीच्या मदतीत नियमांचा अडथळा

घरात ४८ तास पाणी राहण्याची अट पंचनामे सुरू
Nagpur Floods
Nagpur FloodsEsakal
Updated on

नागपूर - पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी १० हजार रुपयांची तात्काळ मदत देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. त्यानुसार पंचनामे ही सुरू झालेत. परंतु, या मदतीसाठी किमान ४८ तास पाणी घरात राहण्याची अट आहे. शहरी भागात अतिवृष्टीनंतर १० ते १५ तासात पाणी ओसरले. त्यामुळे ही अट पीडितांना मदतीपासून बाधा आणणारी आहे.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली. रस्ते जलमय झाले. नदी, तलावात चालणारी बोट रस्त्यावर चालली. अनेकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. लोक रात्रभर घरातील पाणी बाहेर काढत होते. पाण्यामुळे लोकांच्या घरातील साहित्याचे नुकसान झाले. अनेकांच्या दुकानातही पाणी शिरले.

त्यामुळे त्यांचेही मोठे नुकसान झाले. १० हजारांवर लोकांच्या घरात पाणी शिरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या नुकसानापोटी तात्पूरती मदत खावटीच्या माध्यमातून करण्यात येते.पाच हजार रुपयापर्यंतची ही मदत असते. शासनाही ही येत्या पावसाळ्यापुरती १० हजार करण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुकानदारांना नुकसानासाठी ५० हजार नागरिकांना १० हजार रुपयांची मदत तात्काळ देण्याचे जाहीर केले आहे.

Nagpur Floods
Nagpur Floods : शहरातील १५०० दुकानांचे नुकसान

परंतु या नुकसानाच्या मदतीसाठी ४८ तास पाणी घरात, दुकानात राहणे आवश्यक आहे. अनेकांनी आपल्या घरातील, दुकानातील पाणी बाहेर काढले. त्यामुळे त्यांच्या घरात पाणी नाही. २४ तासानंतर पंचनामे सुरू करण्यात आले. अनेकांच्या घरात पाणी नाही. त्यामुळे मदतीत नियमांचा अडथळा येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.

अनेकांच्या घरात फक्त पुराचे अवशेष

अनेकांनी आपल्या घरातून पाणी बाहेर काढले. विशेषतः झोपडपट्टीमधील नागरिकांनी तर कालच घर स्वच्छ केले. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी नाही. फक्त अवशेष म्हणजे ओलावा तेवढा आहे. त्यामुळे ओलावा गृहित धरून मदत देणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.

Nagpur Floods
Nagpur Flood:नागपुरमधील पूरग्रस्तांना सरकारचा आधार! प्रत्येकाला मिळणार १० हजार, दुकानं दुरुस्त करण्यासाठी मिळणार...

अट शिथिल करणार?

केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या दुष्काळी संहितेत ही ४८ तासांची अट आहे. ही अट अतिशय जाचक आहे. या अटीमुळे अनेक जण लाभ, मदतीपासून वंचित राहतात. लोकांना खरच मदत द्यायची असल्यास ही अट शिथिल करण्याची गरज आहे किंवा या अटीच्या बाहेर जाऊन मदत करावी लागणार आहे. त्यामुळे शासन, प्रशासन काय भूमिका घेते, हेच पाहणे महत्त्वाचे आहे.

Nagpur Floods
Nagpur Rain Video : रेल्वे स्टेशनवर पूर! फलाट, रूळावरून वाहू लागल्या नद्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.