नागपूर - नाग नदीला आलेल्या पुरामुळे सुमारे दहा हजार घरांचे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरल्यामुळे घरगुती साहित्य तसेच अन्नधान्य भिजले असून घरातील चिखल काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्यात येईल. तसेच नुकसानीसंदर्भात तात्काळ पूर्ण करून मदत देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी नुकसानीची प्रत्यक्ष पहाणी केली. पुराची तसेच नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याच्या घटनांची संपूर्ण माहिती यावेळी त्यांनी घेतली. तासात १०९ मिलिमीटर पाऊस झाला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नदीचे पात्र कमी पडल्यामुळे इतर वस्त्यांमध्ये पाणी शिरले. यापुढे अशी घटना घडणार नाही,
याची दखल घेण्यात आली असून पाण्याचा प्रवाह कुठेही थांबणार नाही, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात येईल. भविष्यात अशा घटना टाळण्यास येतील असेही नागरिकांना त्यांनी सांगितले.
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे सर्वत्र चिखल साचला आहे. तसेच घरातील चिखल काढण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सर्वांना क्लोरीनच्या गोळ्या देण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासन व महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश फडणवीस यांनी दिलेत. यावेळी माजी महापौर संदीप जोशी, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांमध्ये असंतोष
डागा लेआउट, कार्पोरेशन कॉलनी, शंकरनगरसह इतर वस्त्यांना भेट देऊन येथील नागरिकांशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संवाद साधला. यावेळी त्यांना नागरिकांच्या असंतोषालाही सामोर जावे लागले. प्रशासनाकडून योग्य उपाय करण्यात आले नाही. कुणीच दखल घेतली नाही. मतदानाच्या वेळीच सगळे येतात, अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, काही नागरिकांनी त्यांच्या गाडीचा ताफाही अडविला. दरम्यान, काहींनी प्रत्यक्ष घरातील परिस्थिती पाहण्याची विनंतीही फडणवीसांकडे केली. नुकसानी संदर्भात नागरिकांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या, जास्तीत जास्त मदत करण्याची ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.