Nagpur Ganpati Visarjan 2023 : क्षण आला बाप्पाच्या निरोपाचा; नागपूरकरांची जय्यत तयारी; प्रशासन सज्ज

सार्वजनिक गणेशासह घरोघरी बसलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी (ता. २८) निरोप देण्यात येणार
Ganpati-Visarjan
Ganpati-Visarjansakal
Updated on

नागपूर : सार्वजनिक गणेशासह घरोघरी बसलेल्या लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी (ता. २८) निरोप देण्यात येणार आहे. विसर्जन कार्यात कुठलेही विघ्न येऊ नये, याची खबरदारी घेत प्रशासनाने उपाययोजना आखल्या आहेत. ४ फुटापर्यंतच्या मूर्ती शहर हद्दीमधील कृत्रिम टँकमध्ये तर ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन कोराडी येथील कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महानगरपालिकेने झोननिहाय गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन आपल्या परिसरातील कृत्रिम तलावातच करावे, असे आवाहन महापालिकेने केले. शहरातील फुटाळा, सोनेगाव, सक्करदरा आणि गांधीसागर या प्रमुख तलावासोबतच अन्य तलावांवर लोखंडी टँकची व्यवस्था करण्यात आली आहे.

कृत्रिम तलावाच्या ठिकाणी विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनासाठी कलश ठेवण्यात आले आहेत. मनपाचे कर्मचारी व स्वयंसेवकांकडे निर्माल्य संकलनाची जबाबदारी देण्यात आली आहे. कृत्रिम तलावाच्या ठिकाणी मजबूत लोखंडी बॅरिकेड्स लावण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. याशिवाय विसर्जन परिसरात हायमास्ट लाइट लावण्यात आले आहेत.

स्वयंसेवकही सज्ज

विसर्जनस्थळी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक मनपासोबत नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार आहेत. प्रत्येक विसर्जनस्थळी हे स्वयंसेवक नागरिकांना कृत्रिम विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जन करण्यासाठी मार्गदर्शन करतील. तसेच गणेशोत्सवानिमित्त मंडळांत व विसर्जनस्थळी स्वच्छ भारत अभियान जनजागृती आणि डेंगी व कीटकजन्य आजारांबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.

निर्माल्य संकलनासाठी आवाहन

गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे. ग्रीन व्हिजिल फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था फुटाळा परिसरात गेल्या पाच दिवसांपासून नागरिकांना विसर्जनासाठी मदत करीत आहे. विसर्जनासोबतच निर्माल्य संकलनात ग्रीन व्हिजिल फाउंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी, टीम लिडर सुरभी जैस्वाल आदी सहकार्य करीत आहेत.

९६.७८ टक्के मूर्ती मातीच्या

सोमवारी २५ सप्टेंबर रोजी शहरात सात दिवसांच्या गणपती बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन झाले. मनपाद्वारे व्यवस्था करण्यात आलेल्या विसर्जन टँकमध्ये आतापर्यंत एकूण ७ हजार १७७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. विसर्जित झालेल्या श्रीगणेश मूर्तीमध्ये पीओपीच्या मूर्तीचे प्रमाण हे ३.२२ टक्के असून मातीच्या मूर्तीचे प्रमाण ९६.७८ टक्के एवढे आहे.

विसर्जनाचा मार्ग

कोराडी तलाव

परिमंडळ १ व २ सावरकर नगर चौक

• जेरील लॉन • आठ रस्ता चौक

• लक्ष्मीनगर चौक • बजाजनगर चौक

• शंकरनगर चौक • लक्ष्मीभवन चौक • कॅफे हाउस चौक • लॉ कॉलेज चौक • लेडिज क्लब चौक

• जपानी गार्डन चौक • जुना काटोल नाका चौक

• पोलिस तलाव • पागलखाना चौक • कल्पना टॉकिज चौक • मानकापूर फ्लाय ओव्हर • फरस चौक • कोराडी नाका • गायकवाड कटिंग • कारेमोरे चौक • महादुला टी पॉईंट • भारतमाता चौक मार्गे कोराडी तलाव.

परिमंडळ २ व ४

व्हेरायटी चौक • मॉरीस कॉलेज चौक

• झिरो माईल चौक • संविधान चौक

• एमएसईबीवाय पॉईंट • लिबर्टी चौक

• कॅफे हाउस चौक • मेश्राम पुतळा चौक • छावणी वाय पॉईंट • पागलखाना चौक मार्गे पुढे कोराडी तलाव.

परिमंडळ ३ व ४

गांधीसागर तलाव • आग्याराम देवी चौक

• कॉटन मार्केट चौक • मानस चौक • मॉरीस कॉलेज • झिरो माईल चौक • संविधान चौक • एमएसईबी वाय पॉईंट • लिबर्टी चौक • कॅफे हाउस चौक

• मेश्राम पुतळा चौक • छावणी वाय पॉईंट

• पागलखाना चौक मार्गे पुढे कोराडी तलाव.

परिमंडळ ३

टेलिफोन एक्स्चेंज चौक • चंद्रशेखर आझाद चौक • गांधीपुतळा चौक • अग्रसेन चौक • गीतांजली चौक • दोसर भवन चौक • उड्डाण पुलावरून एलआयसी चौक • लिबर्टी चौक • कॅफे हाउस चौक

• मेश्राम पुतळा चौक • छावणी वाय पॉईंट

• पागलखाना चौक मार्गे पुढे कोराडी तलाव.

परिमंडळ ५

ऑटोमोटिव्ह चौक • कामगारनगर चौक

• कपीलनगर चौक • पॉवर ग्रिड चौक • तथागत चौक • खोब्रागडे चौक • मार्टीननगर उड्डाण पुल मानकापूर चौक • फरस चौक • कोराडी नाका • गायकवाड कटिंग • कारे मोरे चौक • महादुला टी पॉईंट मार्गे कोराडी तलाव.

नाईक तलाव

• अग्रसेन चौक • गांजाखेत चौक • मस्कासाथ चौक • मारवाडी चौक • ईतवारी रेल्वे पुल • दहिबाजार पुल • दलालपुरा चौक

• राऊत चौक • नाईक तलाव.

फुटाळा कृत्रिम तलाव

व्हेरायटी चौक • महाराजबाग चौक • भोले पेट्रोल पंप चौक - लॉ कॉलेज चौक - रविनगर चौक मार्गे फुटाळा कृत्रिम तलाव.

लिबर्टी चौक • सी . के. नायडु चौक • जपानी गार्डन चौक • डब्ल्यु. सी. कार्यालय • तेलंगखेडी मार्गे फुटाळा कृत्रिम तलाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.