Nagpur: गोधनी-बोखारा अंडरपासचे वास्तव; नागरिकांच्या जीवाचा धोका!

Latest Vidarbha News: दुर्दैवाने एका बाजूचे लाईट बंद असल्याने अंधाऱ्या मार्गाने नागरिकांना ये-जा करावी लागते.
Nagpur: गोधनी-बोखारा अंडरपासचे वास्तव; नागरिकांच्या जीवाचा धोका!
Updated on

Nagpur: कमी उंची... रुंदीही फारकाही नाही... अतिशय खोल... काही लाईट सुरू तर काही बंद... वरून रेल्वे गेल्यास होणारा धडाधड आवाज... एखाद्या भयपटाला साजेसा अंडरपास म्हणजे ‘गोधनी बोखारा’, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. वरून कोराडी हायवे असला तरी ५०० मीटर लांब असलेल्या या पुलाखालून जाताना स्थानिक नागरिक दररोज जीवाचा धोका पत्करतात.

गोधनीकडून बोखाऱ्याकडे जायचे असल्यास तुम्हाला बोखारा अंडरपास सोयीचा ठरतो. परंतु हा पूल जेवढा सोयीचा तेवढाच धोक्याचा आहे. अतिशय खोलात असल्याने लाईट असल्याशिवाय पुलाखालून जाणे शक्यच होत नाही. दुर्दैवाने एका बाजूचे लाईट बंद असल्याने अंधाऱ्या मार्गाने नागरिकांना ये-जा करावी लागते.

Nagpur: गोधनी-बोखारा अंडरपासचे वास्तव; नागरिकांच्या जीवाचा धोका!
Nagpur News : बोगस शेतकऱ्यांच्या नावे लाटली अतिवृष्टीची रक्कम; सहा तलाठ्यांसह महसूल सहाय्यक निलंबित
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.