Nagpur: चोरी गेलेले सोने ४४ वर्षांनंतर मिळाले परत! साडेतीन तोळ्याचे दागिने मिळताच महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू

आकस्मात पुढ्यात उभे राहत असतात की ज्यामुळे दुःखात बुडून जातो किंवा आनंदाश्रूने न्हाऊन निघतो. असाच एक अनपेक्षित प्रसंग पचखेडी येथील ६१ वर्षीय महिलेच्या संदर्भात घडला आहे.
Nagpur News
Nagpur News Esakal
Updated on

Stolen Gold Recovered After 44 Years: आकस्मात पुढ्यात उभे राहत असतात की ज्यामुळे दुःखात बुडून जातो किंवा आनंदाश्रूने न्हाऊन निघतो. असाच एक अनपेक्षित प्रसंग पचखेडी येथील ६१ वर्षीय महिलेच्या संदर्भात घडला आहे. ४४ वर्षांपूर्वी चोरी गेलेले सोने परत मिळाल्याने या महिलेला आश्चर्याचा धक्का बसला. एवढेच नव्हे तर अंतिम विजय सत्याचा होतो हे सिद्ध झाले.

पचखेडी येथील रहिवासी माणिक बांगडे यांच्या घरी १९८१ मध्ये चोरी झाली. घरात ठेवलेले साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबविले. बांगडे यांनी वेलतूर पोलिस स्टेशनला चोरी झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करीत तपासाला सुरूवात केली. याप्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर दोन आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले.

तसेच आरोपींजवळून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयाच्या दरबारी गेले. सुनावणी दरम्यान दोन्ही आरोपी सतत गैरहजर राहत असल्याने अनेक वर्षे प्रकरण प्रलंबित होते. न्यायालयाने आरोपींविरोधात जमानती, गैरजमानती वारंट काढले. आरोपी गैरहजर राहत असले तरी न्यायालयीन प्रक्रिया मात्र, थांबली नाही. दोन्ही आरोपींविरूद्ध जाहीरनामा काढण्यात आला. तसेच या प्रकरणाची नोंद ‘डॉरमंट’ म्हणून घेण्यात आली. दरम्यान फिर्यादी माणिक बांगडे यांचे निधन झाले. आता जप्त करण्यात आलेले सोने मिळण्याची आशा बांगडे यांच्या कुटुंबीयांनी सोडून दिली होती.(Latest Marathi News)

भगवान के घर देर है….

चोरट्यांनी लांबविलेले सोने परत मिळणार नाही, अशी आशा बेबी माणिक बांगडे वगळता माणिक यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनी सोडून दिली होती. पण, म्हणतात ना, ‘भगवान के घर देर है, पर अंधेर नही! तब्बल ४४ वर्षांनी बेबी यांना न्यायालयाची नोटीस आली. कोर्टात हजर राहण्यासंदर्भातील ही नोटीस होती. ठरलेल्या तारखेला आणि वेळेवर बेबी आणि कुटुंबीय न्यायालयात हजर झाले.

Nagpur News
Vijender Singh : ऑलिंपिक पदक विजेत्या बॉक्सरचा कॉंग्रेसला रामराम, विनोद तावडेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

जीवनातील दोन क्षण आनंदाचे!

बेबी यांना कोर्टाची नोटीस आली तेव्हा रंगपंचमी जोरात होती. सर्वजण रंग खेळण्यात दंग असताना बेबी यांना न्यायालयाने सुखद धक्का दिला आणि जणू त्यांच्या जीवनात आनंदाचे रंग उतरले. २७ मार्चला कुही न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती एम.सी. शेख यांनी अंदाजे दोन लाख किंमतीचे दागिने बेबी यांना परत केले. (Latest Marathi News)

एवढ्या वर्षांनी चोरी गेलेले दागिने परत मिळाल्याने त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. बेबी यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव पाहून न्यायाधीशही भावुक झाल्या. आत्मिक समाधानाची अनुभूती शेख यांनी अनुभवली.

Nagpur News
Uddhav Thackeray: ठाकरेंच्या शिवसेनेकडून कल्याण, जळगावसह चार जागा जाहीर; 'हे' असतील उमेदवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com