Gondia Mining : गोंदियातील खाण लिलाव प्रक्रियेला हायकोर्टात आव्हान

Gondia Mining : गोंदियातील २० खाणींच्या लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे.
Gondia Mining
Gondia Miningsakal
Updated on

नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील २० खाणींच्या लिलाव प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांनी या प्रक्रियेत १०० रुपये प्रति टन असा दर आरक्षित केला असतानासुद्धा राज्य शासनाच्या महसूल व वन खात्याने ही लिलाव १०१ रुपये प्रति टन या दराने लिलाव करीत कंत्राट काढल्याचा आरोप करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील दुर्गाप्रसाद ठाकरे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.