Nagpur: दोन महीने पाहतोय मृत्यू दाखल्याची वाट, डॉक्टर मात्र बर्थडे पार्टीत मशगूल, शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार

नागपुरच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी मेडिकलच्या वॉर्ड, जन्म-मृत्यू विभागात गोंधळात गोंधळ झाला आणि त्या मृताच्या नातेवाईकाला ५८ दिवसांनंतर मृत्यूचा दाखला मिळाला.
Nagpur GMC
Nagpur GMC Esakal
Updated on

Nagpur Government Death Certificate: मेडिकलमध्ये मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी मेडिकलच्या वॉर्ड, जन्म-मृत्यू विभागात गोंधळात गोंधळ झाला आणि त्या मृताच्या नातेवाईकाला ५८ दिवसांनंतर मृत्यूचा दाखला मिळाला. यानंतरही तो अधिकारी-कर्मचारी यांचे आभार मानून निघून गेला.

मेडिकलमध्ये भिवापूर तालुक्यातील रुग्ण उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल झाला. ३० डिसेंबर २०२३ रोजी तो दगावला. आवश्यक प्रक्रिया करून मृतदेह नातेवाईक घेऊन गेले. अंत्यसंस्कार सामाजिक विधी झाले. यानंतर नातेवाईक मेडिकलमध्ये मृत्यूच्या दाखल्यासाठी आले.

जन्म मृत्यू नोंदणी विभाग, मृत्यू झालेला वॉर्डात मृत्यूच्या दिवशी सेवेवरील डॉक्टर नसल्याचे सांगत आज या, उद्या या, परवा अशी चालढकल झाली. अखेर संतप्त नातेवाईकाने थेट अधिष्ठाता कार्यालय गाठले. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये व दुसऱ्या अधिकाऱ्याला माहिती दिली. वॉर्डात नोंदी नसल्याचे उघड झाले. संबंधित कर्मचाऱ्याकडे पाठवले गेले. कर्मचाऱ्याने पुन्हा वॉर्डात नोंदीचा फार्म भरून आणायला सांगितले. (Latest Marathi News)

त्यानंतरही डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या गोंधळात नातेवाईक सतत भिवापूर येथून खेटे घालत होता. नंतर १२ फेब्रुवारीला शुल्क भरण्यास सांगितले. त्याने पुन्हा अधिष्ठाता कार्यालय गाठून आपबिती सांगितली. अधिष्ठात्यांनी कर्मचाऱ्यांची कानउघाडणी करताच अर्ध्या तासात मृत्यूचा दाखला मिळाला. नाव न टाकण्याच्या अटीवर १२ फेब्रुवारीला अर्ज आल्यावर २६ फेब्रुवारीला प्रमाणपत्र नातेवाईकाला दिल्याची माहिती मिळाली. यापुढे असा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणार असल्याचे स्पष्ट केले.

Nagpur GMC
Action on Nilesh Rane Property: पुण्यात निलेश राणेंच्या मालमत्ता सील, पालिकेची मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?

सर्व्हर डाऊन ते डॉक्टरचा वाढदिवस

भिवापूर येथून मृत्यूच्या दाखल्यासाठी आलेल्या त्या नातेवाईकाला जन्म-मृत्यू नोंदणी विभागात संगणकाचा सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून सलग दोन दिवस परत पाठवण्यात आले. विशेष असे की, काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मृत्यूच्या दाखल्यासाठी आवश्यक नोंदीचा अहवाल डॉक्टरांना पाठवला नसल्याने संबंधित वॉर्डात नातेवाईकाला पाठवले. (Latest Marathi News)

तेथे दोन तास प्रतीक्षा करावी लागली. त्या वॉर्डात चक्क एका डॉक्टरचा वाढदिवसाचा जल्लोष साजरा होत होता. अखेर दुसऱ्या दिवशी नातेवाईकाजवळ असलेल्या नोंदीवरच अहवाल देण्याचे काम येथील डॉक्टरने केले.

Nagpur GMC
Himachal Pradesh: काँग्रेसमध्ये पुन्हा भूकंप! माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाने दिला राजीनामा, सुक्खू सरकार कोसळणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.