Nagpur MBBS Student Locked Himself: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडून घेतल्याने मेडिकलमध्ये खळबळ उडाली. त्याच्या मनावर परिणाम झाल्याची शंका व्यक्त करीत त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेतले होते, अशी माहिती पुढे आली आहे.
मेडिकलच्या बीएससी नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्येची घटना नुकतीच घडली. यानंतर ही घटना समोर आली आहे. अशा घटनांमुळे विद्यार्थी मानसिक दबावाखाली असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. हा विद्यार्थी मुळचा राजस्थान येथील आहे. तेथेही त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मेडिकलमध्ये प्रवेश घेतल्यावर येथेही त्याच्यावर उपचार सुरू होते.
परंतु नोव्हेंबरमध्ये या विद्यार्थ्याने उपचार थांबवले होते. त्याने बुधवारी स्वत:ला खोलीत कोंडून घेतल्याचा प्रकार पुढे आला. ही माहिती मेडिकलच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी पोलिसांना सूचना दिली. हा विद्यार्थी मेडिकलबाहेर एका धर्मशाळेत राहायला असल्याची चर्चा आहे. दरम्यान तो खोलीचे दार तोडून रुग्णवाहिकेतून त्याला मेडिकलमधील मानसोपचार विभागात दाखल करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.